Tarun Bharat

दिल्लीत गेल्या 24 तासात 1374 नवे कोरोना रुग्ण; 12 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


दिल्लीत गेल्या 24 तासात 1374 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 54 हजार 741 वर पोहचली आहे. यामधील 11 हजार 068 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारी 1146 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 1 लाख  39 हजार 447 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4226 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   


ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 13 लाख 37 हजार 374 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 5419 आरटीपीसीआर टेस्ट आणि 14,847 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. 

Related Stories

‘तिहार’मधील 5 कैद्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

Amit Kulkarni

…तर पूर्णपणे बंद होणार नाही कार्यालय

Patil_p

कोईम्बतूर कार स्फोटप्रकरणी एनआयएकडून छापासत्र

Amit Kulkarni

सत्यपाल मलिकांच्या निकटवर्तीयांवर सीबीआयचे छापे

Patil_p

शोपियामधील चकमकीत दोन दहशतवादी ठार

tarunbharat

समाज माध्यमे कायद्याच्या कक्षेत आणा

Patil_p
error: Content is protected !!