Tarun Bharat

दिल्लीत गेल्या 24 तासात 340 नवे कोरोना रुग्ण; 04 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


दिल्लीत मागील 24 तासात 340 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 04 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 31 हजार 589 वर पोहचली आहे. यामधील 2,937 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 390 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 17 हजार 930 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 10,722 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 96 लाख 66 हजार 727 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 39,226 आरटीपीसीआर टेस्ट आणि 32,099 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत. 

Related Stories

२०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसची तयारी; राहुल गांधींच्या नावाने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Archana Banage

मारुती सुझुकीने केला विक्रमी वाहनांचा पुरवठा

Patil_p

रामनाथ कोविंद होणार सोनिया गांधींचे शेजारी

Patil_p

पुलवामा येथे आढळला प्रेशर कुकर आयईडी

Amit Kulkarni

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

datta jadhav

मणिपूर जलपुरवठा प्रकल्पाचा शुभारंभ

Patil_p