Tarun Bharat

दिल्लीत दिवसभरात 1,063 नवे कोरोना रुग्ण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


दिल्लीत दिवसभरात 1 हजार 063 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 37 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 20 हजार 681 वर पोहचली आहे. यामधील 7,909 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 
दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 1,120 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 02 हजार 388 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 10,384 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 81 लाख 22 हजार 974 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 47,889 आरटीपीसीआर टेस्ट आणि 42,031रैपिड एंटिजेन टेस्ट शनिवारी एका दिवसात करण्यात आल्या आहेत. 

Related Stories

कोची-लक्षद्वीपदरम्यान सबमरीन ऑप्टिकल फायबर केबल

Omkar B

केक में अंडा होगा क्या?

Patil_p

पश्चिम बंगालमध्ये वीज कोसळून 20 ठार

Patil_p

हिमाचल प्रदेश : 4 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार सर्व शाळा

Tousif Mujawar

केंद्र सरकारवर पुन्हा ‘पेगॅसस’बॉम्ब !

Patil_p

दुसऱया लाटेचा धोका अद्याप टळलेला नाही!

Patil_p