नवी दिल्ली : दिल्लीतील रोहिणी न्यायालयात गुरुवारी सकाळी 10.30 च्या सुमारास स्फोट झाला. तपासाअंती लॅपटॉप बॅगमध्ये संशयित स्फोट झाल्याचे स्पष्ट झाले असून याबाबत अधिक तपास सुरू आहे. या स्फोटात एक जण जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटानंतर न्यायालयात गोंधळ आणि धावपळ सुरू झाल्यामुळे न्यायालयाचे कामकाज थांबवावे लागले. स्फोटामुळे घटनास्थळी फरशीवर मोठा खड्डा पडला होता. तसेच दिल्ली पोलीस, एनएसजी आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आहे. अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी दाखल झाल्याचे डीसीपी प्रणव तायल यांनी सांगितले.


previous post
next post