Tarun Bharat

दिल्लीत पंतप्रधान मोदींविरोधात भित्तिपत्रके ; १५ जणांना अटक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

देशभरात कोरोना फैलाव वाढतच असुन नागरिकांसोबत शासकिय आरोग्य यंत्रणा ही कोरोना लसीचे डोस उपल्बध नाहीत असे फलक लावत आपण ही यापुढे हतबल झाल्याचे स्पष्ट करत आहेत. असाच प्रकार नवी दिल्ली येथे घडला असुन, पंतप्रधान मोदी यांच्यावर कोरोना लसीकरणाच्या मुद्द्यावरुन टिका करत अशा आशयाची पत्रके चिकटवल्याने दिल्ली पोलिसांनी १७ गुन्हे दाखल केले असून या पैकी १५ जणांना अटक केली आहे.

या भित्तिपत्रकांत ‘मोदीजी, हमारे बच्चोंकी व्हॅक्सिन विदेश क्यू भेज दिया’ असे खडे सवाल मोदी सरकारला करत मोदींच्या कारभारावर बोट ठेवलं आहे. दिल्ली शहरातील अनेक ठीकाणी अशी पत्रके चिकटवल्याने भादंवि १८८ तसेच मालमत्ता विद्रुपीकरणविरोधी कायद्याच्या आधारे नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.

याबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की आणखी गुन्हे दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे. चौकशी सुरू असून ही भित्तिपत्रके चिकटवणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल असे ही स्पष्ट त्यांनी केलं आहे.

दिल्ली येथे पंतप्रधान मोदींविरोधात लावलेली भित्तिपत्रके

दिल्लीतील नागरिकांनी या केलेल्या कृत्याच समर्थन केले आहे. आणि याबद्दल आपल्याला ही अटक करा अशा आशयाची पोस्ट ट्ववीट केली आहे.

Related Stories

जि. प.कडील 2 कोटीचा निधी पालिकेकडे होणार वर्ग

Patil_p

लडाखमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Tousif Mujawar

ट्विटरला टक्कर देणार स्वदेशी ‘कू’

Patil_p

जितेंद्र त्यागींना अंतरिम जामीन मंजूर

Patil_p

आसाम-अरुणाचल प्रदेशमध्ये सीमावाद सोडवण्यावर सहमती

Patil_p

सांगली : वाळव्यात ‘त्या’ पॉझिटिव्ह पोलीस कर्मचाऱ्याचीआई,पत्नी ही पॉझिटिव्ह

Archana Banage