Tarun Bharat

दिल्लीत पहिल्यांदाच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या सुनावणीत झाला घटस्फोटाचा निर्णय

ऑनलाईन टीम / दिल्ली : 


देशात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. लॉक डाऊन दरम्यान, दिल्लीतील रोहिणी कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे  या खटल्याची सुनावणी पार पडली. पहिल्यांदाच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या खटल्यामध्ये कोर्टाने घटस्फोटाचा निकाल दिला आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश दीपक गर्ग यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे  या खटल्याचे कामकाज पाहिले. न्यायालय कामकाजा दरम्यान, घटस्फोटासाठी अर्ज करणारे पती आणि पत्नी या दोघांच्या बाजू कोर्टाने ऐकून घेतल्या. दोघांची बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने 12 जून रोजी घटस्फोटाचा निकाल दिला. 


हा निर्णय देताना न्यायाधीश म्हणाले, मला  याचा आनंद आहे की, दोन्ही पक्षांनी कोणत्याही प्रकारचा धोका, जोर जबरदस्ती न करता परस्पर संमतीने घटस्फोटाचा निर्णय मान्य केला. पुढे ते म्हणाले, दोन्ही पक्षांनी आपापसातील वाद मिटवून भविष्यात एकमेकांवर किंवा एकमेकांच्या नातेवाईकांवर कोणत्याही प्रकारचा खटला दाखल करणार नाही, असे आश्वासन दिले आहे. 


दरम्यान, यांचे लग्न जून 2017 मध्ये झाले होते. मात्र, सतत होणाऱ्या भांडणामुळे डिसेंबर 2018 पासून ते विभक्त रहात होते. त्यावेळी दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यातील वाद मिटवण्याचे बरेच प्रयत्न केले. मात्र, ते अयशस्वी ठरल्याने शेवटी दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. 

Related Stories

शिवसेना-भाजप युतीबाबत केसरकरांचा गौप्यस्फोट ; म्हणाले, राणेंमुळे युती…

Archana Banage

काँग्रेसला वगळून नवीन आघाडी करण्यावर सेनेचा आक्षेप

Archana Banage

ही आहे ‘पानां’ची शोरुम

Patil_p

अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा ; चंद्रकांत पाटील यांचं थेट अमित शाहांना पत्र

Archana Banage

लष्कराच्या इंजिनिअर्सनी 72 तासात गलवान नदीवर उभारला पूल

datta jadhav

जितेंद्र आव्हाडांकडून रक्तदान करण्याचे आवाहन

Archana Banage