Tarun Bharat

दिल्लीत पारा 45 अंशांच्या पार

Advertisements

देशातील 10 शहरांमध्ये उष्णतेचे संकट : तापमान वाढल्याने लोकांचे हाल : उत्तर भारतीय शहरांमध्ये उष्णलाट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कोरोना संकटादरम्यान देशातील उष्णताही सातत्याने वाढू लागली आहे. दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये उष्णलाटेस प्रारंभ झाला आहे. दिल्लीत तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाला आहे. राजस्थानमधील चुरू आणि श्रीगंगानगर सर्वाधिक तप्त राहिले असून तेथे 47 अंशांच्या नजीक पारा पोहोचला आहे.

मे महिन्यातील चौथा आठवडा सुरू असून भारतात मान्सूनपूर्व पाऊस पडल्याने आतापर्यंत उष्णलाटेस प्रारंभ झाला नव्हता. परंतु आता तापमान वाढू लागल्याने उष्णतेचा प्रकोपही वाढला आहे. राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात तापमानात मोठी भर पडली आहे. राजस्थानच्या 3 शहरांमध्ये पारा 46 अंशांच्या पार पोहोचला आहे. उत्तरप्रदेशच्या झाशीमध्येही कमाल तापमान 46 अंशांपेक्षा अधिक झाले आहे.

आगामी 5 दिवसांपर्यंत उत्तरभारत विशेषकरून राजस्थानला तप्तलाटेपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. हवामान विभागानुसार मध्यप्रदेश आणि राजस्थानात उष्णतेत भर पडू शकते. विशेषकरून पश्चिम राजस्थानला उष्णतालाटेचा मार झेलावा लागणार आहे. याचबरोबर उत्तरप्रदेशातही उष्णवारे वाहू शकतात. पुढील आठवडय़ात अनेक ठिकाणी पारा 48 ते 49 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अनुमान आहे.

दिलासा नाहीच

Related Stories

हवाई तळावरील हल्ल्यामागे हाफिज सईद, आयएसआय

datta jadhav

21 एप्रिलपर्यंत मिळणार 21 राफेल विमाने

Omkar B

मराठा आरक्षण सुनावणी लांबणीवर

Patil_p

झारखंडमध्ये सापडला 250 किलो सोन्याचा खजिना

datta jadhav

झारखंडमध्ये 5 उग्रवादी अटकेत

Patil_p

मुंबईतून १५ कोटी रुपयांच्या रक्तचंदनाची तस्करी

Sumit Tambekar
error: Content is protected !!