Tarun Bharat

दिल्लीत पेट्रोल 8 रुपयांनी स्वस्त; महाराष्ट्रात कधी?

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दिल्ली सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पेट्रोलवरील व्हॅट 11 टक्क्यांनी कमी करून 19.40 टक्क्यांवर आणला आहे. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलची किंमत आता प्रति लिटर 8 रुपयांपर्यंत कमी झाली आहे. पेट्रोलचे कमी झालेले दर आज मध्यरात्रीपासून लागू होतील.

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर आधीच कमी केला होता. त्यानंतर राज्य सरकारांवर स्वत:च्या पातळीवर व्हॅटच्या किंमती कमी करून लोकांना दिलासा देण्यासाठी दबाव होता. केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशातील कर्नाटक, हरियाणा, हिमाचल प्रदेश, चंदीगढ, उत्तराखंड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश यासारख्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी केला. आज दिल्ली सरकारने व्हॅट कमी करुन पेट्रोलचे दर कमी केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. दरम्यान, महाराष्ट्र सरकार व्हॅट कमी करुन इंधन दरकपातीचा निर्णय कधी घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Related Stories

हैद्राबाद : औषधाच्या फॅक्टरीत भीषण आग; 8 जण गंभीररित्या भाजले

Tousif Mujawar

देशासाठी फेब्रुवारीही थंडीचा

datta jadhav

देशातील 11 राज्यात 101 ओमिक्रॉनबाधित

Patil_p

‘लष्कर-ए-तोयबा’च्या मॉड्य़ूलचा पर्दाफाश

Amit Kulkarni

2021-22 मध्ये भारताची निर्यात 44 टक्क्यांनी वधारली

Patil_p

रोहितचे तुफान, मुंबई इंडियन्सची बाजी

tarunbharat