Tarun Bharat

दिल्लीत मागील चोवीस तासात 1366 नवे कोरोना रुग्ण, एकूण संख्या 31309 वर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. देशाची राजधानी दिल्लीत तर चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीत मागील चोवीस तासात 1366 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांचा एकूण आकडा 31 हजार 309 वर पोहचला आहे. 


तर कालच्या दिवसात 504 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 31,309 रुग्णांपैकी 11 हजार 861 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या दिल्लीत 18 हजार 543 रुग्णांवर उपचार सुरू असून आता पर्यंत 905 लोकांनी आपला जीव गमावला आहे. 


दरम्यान, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मंगळवारी दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या 31 जुलै पर्यंत साडे पाच लाखांवर जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच राजधानीत 81 हजार खाटा असल्याचा दावा सरकार करीत आहे. मात्र, खरेच राजधानी किती खाटा उपलब्ध आहेत, याची पडताळणी करणारे कोणतेही आकडे समोर आलेले नाहीत.  

Related Stories

चमोली प्रलयातील 130 बेपत्ता घोषित

Patil_p

पुणे : आईसह सहा वर्षांच्या चिमुकल्याची हत्या; वडीलही बेपत्ता!

Tousif Mujawar

माजी सरन्यायाधीश ए.एम.अहमदी यांचे निधन

Amit Kulkarni

फटाके कारखान्यात स्फोट; तामिळनाडूत 11 जण ठार

Patil_p

केरळच्या मशिदीत मंत्रोच्चार

Patil_p

अमरनाथ यात्रामार्गावर अतिदक्षतेचे आदेश

Patil_p