ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत शुक्रवारी 266 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 7 जणांनी आपला जीव गमावला. यासोबतच 319 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्य स्थितीत सक्रिय रुग्णांची संख्या 2060 इतकी आहे. यातील 943 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मार्च महिन्यापासून पहिल्यांदाच असे झाले आहे की, रुग्णालयातील कोरोना रुग्णांची संख्या एक हजार पेक्षा कमी आहे.


आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण रुग्णांची संख्या 6 लाख 33 हजार 542 इतकी आहे. यातील 6,20,693 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत एकूण 10,789 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98% इतके आहे.
दरम्यान, दिल्लीत आतापर्यंत 1 कोटी 2 लाख 12 हजार 593 लोकांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी एका दिवसात 71,850 टेस्ट केल्या गेल्या. त्यातील 43,105 आरटीपीसीआर टेस्ट आणि 28,745 रैपिड एंटिजेन टेस्ट आहेत.