Tarun Bharat

दिल्लीत मागील 24 तासात 320 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


राजधानी दिल्लीत मागील 24 तासात 320 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 4 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 41 हजार 660 वर पोहचली आहे. यामधील 1,812 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 234 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 28 हजार 920 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 10,928 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 29 लाख 40 हजार 550 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 40,885 आरटीपीसीआर टेस्ट आणि 25,859 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत. 

Related Stories

‘आयएनएस कोची’ची अरबी समुद्रात चाचणी

Patil_p

पंजाबमध्ये चकमक : 3 संशयित ठार

Patil_p

पंतप्रधान मोदींनंतर ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली कोरोनाची लस

Tousif Mujawar

न्यायवृंदाकडून न्यायाधीशांच्या बदल्यांची सूचना

Patil_p

स्वबळावर लढवतोय निवडणूक, पुन्हा सत्तेवर येऊ

Patil_p

संजय राऊत राहुल गांधींची भेट घेणार; शरद पवारांनीही बोलावली बैठक

Abhijeet Khandekar