Tarun Bharat

दिल्लीत मागील 24 तासात 66 नवे कोरोना रुग्ण; 79 डिस्चार्ज!

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


राजधानी दिल्लीत कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मागील 24 तासात केवळ 66 नवे रुग्ण आढळून आले असून एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कालच्या दिवशी 79 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. 


आरोग्य विभागाकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, राजधानीत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 14 लाख 35 हजार 419 वर पोहोचली आहे. त्यातील 14 लाख 09 हजार 739 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य स्थितीत संसर्ग दर 0.9 % इतका आहे. तर आतापर्यंत 25,023 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


सद्य स्थितीत 657 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिल्लीत आतापर्यंत जवळपास 2 कोटी 26 लाख 48 हजार 736 टेस्ट करण्यात आल्या आहेत. यातील 52,223 आरटीपीसीआर टेस्ट आणि 24,236 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत दिल्लीत 532 झोन आहेत.

Related Stories

दक्षिण चीन समुद्रात भारतीय युद्धनौका तैनात

Patil_p

हेमंत सोरेन यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द

Patil_p

असदुद्दीन ओवैसींच्या घराची तोडफोड; हिंदू सेनेचे 5 जण ताब्यात

datta jadhav

Karnataka : गुजरात निवडणुकीनंतर कर्नाटक मंत्रिमंडळाचा विस्तार; मुख्यमंत्र्यांचे संकेत

Abhijeet Khandekar

आरबीआयकडून ‘ई-रुपये’ लवकरच

Patil_p

जो बायडेन यांचं राष्ट्राला उद्देशून भाषण म्हणाले, अफगाणी नेत्यांनी संघर्ष न करता हार मानली त्यामुळे…

Abhijeet Shinde
error: Content is protected !!