Tarun Bharat

दिल्लीत शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्यात दीड तास चर्चा

Advertisements

नवी दिल्ली / ऑनलाईन टीम

मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरण व मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रात राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींना वेग आला आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सकाळी दहा वाजता भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर दीड तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

शरद पवार अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राजधानी दिल्लीत आहेत. संसदेतून परतल्यानंतर शरद पवारांची अनिल देशमुखांनी भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.

अंबानी स्फोटक प्रकरणाच्या तपासात आमच्या अधिकाऱ्यांकडून गंभीर चुका झाल्या. त्यामुळे आता निष्पक्ष चौकशीसाठी मुंबईच्या आयुक्तांसह राज्यातील इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. आता अंबानी स्फोटक प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून योग्यपणे सुरु आहे. या चौकशीत जे सत्य समोर येईल त्यानंतर राज्य सरकार दोषींवर कारवाई केली जाईल. कनिष्ठ किंवा वरिष्ठ दर्जाचा कोणताही अधिकारी असो त्याच्यावर कारवाई होईल, अशी ग्वाही अनिल देशमुख यांनी दिली.

Related Stories

लोककल्याणाचा वसा हा शाहू महाराजांचा अनुयय – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत घट

Abhijeet Shinde

अकोला जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1841 वर

Rohan_P

मध्य प्रदेश : उद्या रात्रीपासून इंदौर – भोपाळमध्ये नाईट कर्फ्यू

Rohan_P

सी फोर्ट सर्किट टूरिझम प्रकल्प राबवा – खासदार संभाजीराजे

Abhijeet Shinde

दिल्लीत मागील 24 तासात 4,525 नवीन कोरोना रुग्ण; 340 मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!