Tarun Bharat

दिल्लीत सध्या लॉकडाऊनची गरज नाही; पण… : सत्येंद्र जैन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


दिल्लीत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने दिल्लीत पुन्हा एकदा लॉकडाऊन केले जाईल, अशी चर्चा आहे. मात्र, त्यानंतर आज दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले की, दिल्लीत पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार नाही. मात्र, बाजार बंद केले जातील असे संकेतही त्यांनी यावेळी दिले. 


पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन करण्याची गरज नाही आहे. मात्र, स्थानिक स्तरावर नियम अधिक कडक केले जाणार आहेत. पुढे ते म्हणाले, सध्या दिल्लीत अधिकाधिक टेस्ट केल्या जात आहेत. या पुढील काळातही या टेस्टची संख्या वाढवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.


दरम्यान, छट पुजेसंदर्भात विचारले असता जैन म्हणाले, छट पूजेसाठी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे घाटांवर पूजा करण्यास बंदी घालण्यात आली आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Related Stories

मुंबई, पुणे पूर्णपणे बंद करणार?

datta jadhav

राज्यात निम्मे रुग्ण संसर्गमुक्त

Patil_p

खुशखबर : महाराष्ट्रात राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी

Tousif Mujawar

16 जानेवारी हा दिवस ‘नॅशनल स्टार्टअप डे’ म्हणून साजरा होणार

datta jadhav

राजू शेट्टी हे होमपिचवर भुईसपाट

Archana Banage

6 हजार कोटींचे भांडवल केंद्र सरकार गुंतवणार

Omkar B