Tarun Bharat

दिल्लीत हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दिल्लीत आज सकाळी 4.1 अंश किमान तापमानाची नोंद झाली. या हंगामातील ही सर्वात कमी तापमानाची नोंद आहे. दिल्लीच्या इतिहासातील सर्वात कमी तापमान 27 डिसेंबर 1930 रोजी शून्य अंशात नोंदवले गेले. 

दिल्लीच्या बहुतांश भागात हवेचा गुणवत्ता निर्देशांक 200 ते 300 दरम्यान नोंदवला गेला आहे, जो अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. थंडीच्या लाटेमुळे सोमवारी कमाल तापमान 19.4.अंश नोंदवले गेले. ते नेहमीपेक्षा चार अंशांनी कमी होते. 10 आणि 11 अंशांच्या आसपास वाहणारे किमान तापमान 8.4 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. 4 डिसेंबरनंतरचे हे सर्वात कमी किमान तापमान होते. मात्र, मंगळवारच्या थंडीने सर्व विक्रम मोडले आहेत. 

मागील वर्षी 14 डिसेंबरला कमाल तापमान 18.7 अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. या वर्षी 1 डिसेंबर ते 13 डिसेंबर या कालावधीत कमाल तापमान 26 ते 21 अंशांदरम्यान राहिले. 1 डिसेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत किमान तापमान 8.2 अंशांच्या आसपास राहिले.

Related Stories

उत्तराखंड अतिवृष्टीत बचावकार्य सुरु, मृतांचा आकडा 68 वर

Archana Banage

निर्भया : पुढची सुनावणी 11 फेब्रुवारी रोजी

prashant_c

गरिबांच्या सबलीकरणाला भाजपचे प्राधान्य

Patil_p

योगी सरकारमधील ‘या’ मंत्र्याला कोरोनाची लागण

Tousif Mujawar

अफगाणच्या संकटावर दाखविली एकजूट

Patil_p

केरळमध्ये ख्रिश्चन मतदारांना भाजपची साद

Amit Kulkarni
error: Content is protected !!