ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत दिवसेंदिवस रुग्ण वाढीचे आणि मृत्यूंचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. आज दिवसभरात 127 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 36 हजार 387 वर पोहचली आहे. यामधील 1,046 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 131 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 24 हजार 457 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 10,884 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 13 लाख 23 हजार 764 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 44,878 आरटीपीसीआर टेस्ट आणि 21,925 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत.