Tarun Bharat

दिल्लीत 29 टक्के लोकांमध्ये प्रतिजैविकं

Advertisements

नवी दिल्ली /वृत्तसंस्था :

दिल्लीमध्ये दुसऱयांदा झालेल्या सीरो सर्वेक्षणात 29.1 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी (प्रतिजैविक) आढळून आल्या आहेत. दिल्लीची लोकसंख्या सुमारे 2 कोटी इतकी आहे. यातून 15 हजार नमुने प्राप्त करण्यात आले होते. मागीलवेळी झालेल्या सीरो सर्वेक्षणात 23.48 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या होत्या. दुसऱया सर्वेक्षणात 28.3 टक्के पुरुषांमध्ये आणि 32.2 टक्के महिलांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली आहे.

उत्तर-पूर्व दिल्लीत 29 टक्के, दक्षिण दिल्लीत 27 टक्के, दक्षिणपूर्वमध्ये 33 टक्के तर नवी दिल्लीत 24 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज सापडल्या आहेत. दिल्लीत तिसरे सीरो सर्वेक्षण 1 सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. तेथे पहिले सर्वेक्षण 27 जून ते 10 जुलैदरम्यान पार पडले होते. यात 21 हजारांपेक्षा अधिक जणांचे रक्तनमुने घेण्यात आले होते. यातील 23.48 टक्के लोकांमध्ये कोरोना विषाणूच्या अँटीबॉडीज मिळाल्या होत्या.

सीरो सर्वेक्षण

कुठल्या लोकसंख्येत संसर्ग किती फैलावला आहे हे पडताळून पाहण्यासाठी सीरोलॉजिकल सर्वेक्षण केले जाते. या सर्वेक्षणात लोकांच्या रक्तात कोरोना विषाणूच्या अँटीबॉडीजच्या अस्तित्वाचा शोध घेतला जातो. विषाणू शरीरात प्रवेश करतो, तेव्हा शरीर त्याला नष्ट करण्यासाठी काही प्रोटीन्स तयार करते आणि त्यांनाच अँटीबॉडीज म्हटले जाते. त्यांचा आकार इंग्रजी ‘वाय’ अक्षरासारखा असतो.

अँटीबॉडी मिळण्याचा अर्थ

ज्या व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडी मिळाल्या आहेत, तो एकतर कोरोनाने बाधित आहे किंवा संसर्गातून मुक्त झालेला आहे. यातील अनेक लोकांना संसर्ग झाल्याचे समजून देखील येत नाही. अशा व्यक्तींमध्ये कुठलीच लक्षणे दिसून येत नाहीत. अशा रुग्णांना असिम्प्टॉमॅटिक म्हटले जाते. तर लक्षणे दिसून येणाऱया रुग्णांना सिम्प्टॉमॅटिक संबोधिण्यात येते.

अँटीबॉडी विकसित होण्याचा लाभ

तज्ञांनुसार 40 ते 60 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज विकसित झाल्या असल्यास त्याला समूह रोगप्रतिकारकशक्तीचा टप्पा म्हटले जाऊ शकते. या टप्प्यामुळे संसर्ग फैलावण्याचा धोका कमी होतो. परंतु समूह रोगप्रतिकारकशक्तीचा दावा लस देऊन संसर्गाचा सर्वाधिक धोका असलेल्या लोकांना सुरक्षित केल्यावरच क्हावा असे तज्ञांनी सुचविले आहे.

दिल्ली नियंत्रणात

राजधानीमध्ये बुधवारी 1,374 नवे रुग्ण सापडले आहेत. तर आतापर्यंत 1.56 लाख बाधित आढळून आले आहेत. यातील 1.40 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. तर सुमारे 11 हजार ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तेथे 27 जून ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 28 हजार 329 वर पोहोचली होती. परंतु त्यानंतर करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे हा आकडा कमी झाला आहे. तेथे 100 चाचण्यांमागे 11 बाधित सापडत आहेत.

Related Stories

लॉकडाऊनमध्ये 30 एप्रिलपर्यंत वाढ

Patil_p

ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री रागिणी द्विवेदीला अटक

Patil_p

गुणामध्ये युवा स्वयंसेवक शिबिर

Patil_p

“लवकरच कोरोना संपणार;” विषाणूशास्त्रज्ञांचा दावा

Abhijeet Shinde

…म्हणुन भाजप, काँग्रेसवाले मला शिव्या द्यायला लागले – अरविंद केजरीवाल

Sumit Tambekar

अर्थव्यवस्थेत ४ दशकातील सर्वात मोठी घसरण

Amit Kulkarni
error: Content is protected !!