Tarun Bharat

दिल्लीत 3 हजार पेक्षा अधिक कोरोना रुग्ण

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


मागील 24 तासात दिल्लीत 3 हजार 734 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 109 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 लाख 82 हजार 058 वर पोहचली आहे. यामधील 29,120 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 4,834 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 5 लाख 43 हजार 514 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 9,424 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 65 लाख 00 हजार 700 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 33,298 आरटीपीसीआर टेस्ट आणि 41,932 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. 


सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 4.96 % आहे. तर 5759 झोन आणि 334 कंट्रोल रूम आहेत. 

Related Stories

शेतकऱयाने खरेदी केले 30 कोटीचे हेलिकॉप्टर…

Patil_p

चक्क एका महिला अँकरने घेतली तालिबान प्रवक्त्याची मुलाखत

Abhijeet Shinde

व्हाईस अ‍ॅडमिरल आर हरी कुमार आज नौदल प्रमुख म्हणून पदभार स्विकारणार

datta jadhav

देशात नवीन राष्ट्रीय बँकेची स्थापना : सीतारामन

datta jadhav

लोकशाहीच्या जपणुकीसाठी कटिबद्ध राहुया!

Patil_p

राष्ट्रीय ग्रामस्वराज योजनेला कालावधीवाढ

Patil_p
error: Content is protected !!