Tarun Bharat

दिल्लीत 757 नवे कोरोना रुग्ण; 16 जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


दिल्लीत काल 757 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 16 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 22 हजार 851 वर पोहचली आहे. यामधील 6,713 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 939 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 05 हजार 685 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 10,453 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 83 लाख 51 हजार 048 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 40,742 आरटीपीसीआर टेस्ट आणि 34,468 रैपिड एंटिजेन टेस्ट शनिवारी एका दिवसात करण्यात आल्या आहेत. 

Related Stories

पुन्हा लॉकडाउन नको असल्यास सहकार्य करा : मुख्यमंत्री येडियुरप्पा

Archana Banage

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Patil_p

”नागरिकांचा जीव जात असताना पंतप्रधान मात्र टॅक्स वसूलीत मग्न”

Archana Banage

‘जी-20’च्या तयारीवर सर्वपक्षीय चर्चा

Patil_p

देशात 28,903 रुग्णांची वाढ

datta jadhav

घरबसल्या पाण्याच्या थेंबांपासून वीज

Patil_p