Tarun Bharat

दिल्लीमध्ये कोरोना ग्रस्तांची संख्या 14 हजार पार

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दिल्लीत मागील चोवीस तासात 635 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे दिल्लीतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 14 हजार 53 वर पोहचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तर कालच्या एका दिवसात 231 रुग्णांना प्रकृती सुधारली असल्याने घरी सोडण्यात आले आहे. तसेच आता पर्यंत 276 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, लॉक डाऊन मध्ये सूट दिल्याने दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील आठवड्याभरात 3500 रुग्ण आढळून आले आहेत. मात्र घाबरून जाण्याची गरज नाही. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या कशी कमी करता येईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच दिल्लीतील सरकारी व खाजगी रुग्णालयात मिळून 4,500 बेड तयार आहेत, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Stories

अर्णव प्रकरणात उच्च न्यायालयावर ताशेरे

Patil_p

साऊंड सिस्टीम लावल्याचा कारणातून तरुणाचा भोसकून खून

Archana Banage

अजित पवार हसले, आणि म्हणाले…

Tousif Mujawar

पंतप्रधान हे देशासाठी पित्यासमान आहेत- कंगना राणावत

Archana Banage

भारताने कोरोना विरुद्धच्या लढाईत नोंदवले अनेक उच्चांक

Archana Banage

पेगॅससवरून पुन्हा संसद ठप्प

Patil_p
error: Content is protected !!