Tarun Bharat

दिल्लीहून देहरादूनला जाणाऱ्या शताब्दी एक्सप्रेसच्या बोगीला आग

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


दिल्लीहून देहरादूनला जाणाऱ्या दिल्ली-देहरादून शताब्दी एक्सप्रेसच्या बोगीला आग लागली. ही ट्रेन रायवाला ते देहरादून जात असताना कांसरो स्थानकाजवळ ही घटना घडली. राजाजी व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य भागात कांसरो स्टेशन येते. ज्या डब्यात आग लागली त्या कोचला वेगळे करण्यात आले आहे. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही.


मिळालेल्या माहितीनुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली. या घटनेनंतर रेल्वेमध्ये गोंधळ उडाला. घटनास्थळावर कांसरो रेंजमधील रेंजर व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन बचावकार्य सुरू केले. ज्वालांनी वेढलेली बोगी मुख्य रेल्वेपासून वेगळी करण्यात आली. या आगीत पूर्ण बोगी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. आसनाबरोबरच संपूर्ण बोगीचा जळून कोळसा झाला.


दरम्यान, उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, आग लागलेल्या दिल्ली-देहरादून शताब्दी एक्सप्रेसच्या सी -4 डब्यात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सर्व प्रवासी सुरक्षित असून शताब्दी एक्स्प्रेस देहरादून स्थानकात दाखल झाली आहे. 


उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत म्हणाले की, दिल्लीहून देहरादूनला जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसच्या एका डब्यात राजाजी व्याघ्र प्रकल्पाच्या कांसरो रेंजजवळ आग लागल्याची माहिती मिळाली. भगवान बद्री विशाल आणि बाबा केदार यांच्या कृपेने कोणीतीही जीवितहानी या घटनेत झाली नाही. सर्व प्रवासी सुखरुप आहेत. 

Related Stories

बिहारमध्ये 31 मंत्र्यांनी घेतली शपथ

Patil_p

अनिल देशमुखांविरोधात कटकारस्थान झालं, नवाब मलिकांचा आरोप

Archana Banage

हाथरस येथे पायी निघालेल्या राहुल गांधींना यूपी पोलिसांकडून अटक

Tousif Mujawar

पहिल्यांदा राऊतांनी स्वत:ची किंमत ओळखली: निलेश राणे

Archana Banage

नव्या वर्षात दक्षिण आफ्रिकेतून येणार चित्ता

Patil_p

‘एसएसएलव्ही’चे प्रक्षेपण यशस्वी, पण उपग्रह भरकरटले!

Patil_p
error: Content is protected !!