Tarun Bharat

दिल्ली : आयजीआय विमानतळ बॉम्बने उडविण्याची धमकी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

अल कायदाने दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवून देण्याची धमकी दिली आहे. पुढील काही दिवसांत आयजीआय विमानतळ उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल दिल्ली पोलिसांना शनिवारी संध्याकाळी अल कायदाच्या नावाने मिळाला. त्यानंतर विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. 

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी संध्याकाळी दिल्ली पोलिसांना आलेल्या मेलमध्ये करणबीर सूरी उर्फ मोहम्मद जलाल आणि त्यांची पत्नी शैली शारा उर्फ हसीना रविवारी सिंगापूरहून भारतात येत असल्याचे म्हटले आहे. पुढील एक ते तीन दिवसांत विमानतळावर बॉम्ब लावण्याचा त्यांचा कट आहे. धोका मिळाल्यानंतर सुरक्षा एजन्सींना सतर्क करण्यात आले असून, सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

Related Stories

कोल्हापूर-मुंबई सुपरफास्ट रेल्वेगाडी सुरू करा

Abhijeet Khandekar

अयोध्या दीपोत्सवाच्या विश्वविक्रमासाठी सज्ज

Archana Banage

पलानिसामी हेच अण्णाद्रमुकचे सर्वोच्च नेते

Patil_p

फार्मइझीने नेमले नवे संचालक

Patil_p

महाराष्ट्रातील कोरोना : मागील 24 तासात 9,336 नवे रुग्ण; 123 मृत्यू

Tousif Mujawar

साहित्य अकादमी पुरस्कार 24 साहित्यिकांना प्रदान

Patil_p