Tarun Bharat

दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंचा जिममध्ये सराव

Advertisements

वृत्तसंस्था/ दुबई

कोरोना महामारी समस्येमुळे 2021 सालातील आयपीएल क्रिकेट स्पर्धा अर्धवट स्थितीमध्ये थांबवावी लागली होती. आता या स्पर्धेतील उर्वरित सामने दुबईमध्ये 19 सप्टेंबरपासून खेळविले जाणार आहेत. या स्पर्धेसाठी दिल्ली कॅपिटल्स संघातील खेळाडूंचे 21 ऑगस्टला दुबईत आगमन झाले. दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंनी  काही वेळ जिममध्ये सराव केला.

शनिवारी दिल्ली कॅपिटल्स संघातील खेळाडूंनी जिममध्ये सराव करीत असलेले छायाचित्र टिव्टरवर प्रसिद्ध करण्यात आले. दुबईमध्ये दाखल झाल्यानंतर दिल्ली कॅपिल्टसचे खेळाडू 7 दिवस क्वारन्टाईन होते.

या स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघ संयुक्त अरब अमिरातमध्ये दाखल झाले असून त्यांच्या सरावालाही प्रारंभ झाला आहे. अर्धवट स्थितीत थांबविण्यात आलेल्या 14 व्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील 19 सप्टेंबरला दुबईत प्रारंभ होणार असून चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना खेळविला जाईल. 19 सप्टेंबरच्या सामन्यानंतर सदर स्पर्धा अबुधाबीमध्ये हलविण्यात येणार आहे. अबुधाबीत कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चँलेंजर्स बेंगळूर यांच्यात सामना होईल. शारजामध्ये 24 सप्टेंबरला रॉयल चँलेंजर्स बेंगळूर आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात लढत होईल. या स्पर्धेतील 13 सामने दुबईत, 10 सामने शारजामध्ये तर 8 सामने अबु धाबीत खेळविले जाणार आहेत.

Related Stories

बॅडमिंटनपटू मिथुन मंजुनाथ अंतिम फेरीत

Patil_p

लिजेंडस् लिग क्रिकेट स्पर्धा कार्यक्रम जाहीर

Patil_p

लि निंग कराराबाबत फेरविचार

Patil_p

‘स्काय डायव्हिंग’ने जर्सीचे ‘रॉयल’ अनावरण

Patil_p

उत्तर कोरियाच्या माघारीमुळे मिराबाई चानूला पदकाची आशा

Patil_p

‘स्ट्रगलर्स’ चेन्नई-हैदराबाद पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील

Patil_p
error: Content is protected !!