Tarun Bharat

दिल्ली कॅपिटल्स-सीएसके आज आमनेसामने

धोनी बढतीवर येण्याची अपेक्षा, कॅपिटल्सला रविचंद्रन अश्विनच्या दुखापतीची चिंता

वृत्तसंस्था / दुबई

चेन्नई सुपरकिंग्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात शुक्रवारी लढत होणार असून चेन्नईचा हा या आयपीएलमधील तिसरा सामना आहे. कर्णधार धोनीच्या फलंदाजीचा क्रम याबाबत या सामन्यात उत्सुकता असून त्याला बढतीवर पाठविले जाण्याची शक्यता आहे. सायंकाळी 7.30 पासून सामन्याची सुरुवात होईल.

शारजाहमध्ये राजस्थान रॉयल्सकडून चेन्नईला पराभवाचा धक्का बसला होता, त्यांच्या स्पिनर्सचे अपयश हेच त्याचे मुख्य कारण असले तरी फलंदाजांचे निष्प्रभ प्रदर्शनदेखील कारणीभूत आहे. विशेषतः मुरली विजय, केदार जाधव व स्वतः कर्णधार धोनी. सॅम करण, जाधव, रुतुराज गायकवाड यांसारख्यांना बढती देऊन धोनी स्वतः सातव्या क्रमांकावर फलंदाजीस आला. पण हा डाव पूर्णपणे फसला आणि फॅफ डय़ु प्लेसिसवर थोडय़ा अवधीत मोठे काम करण्याची जबाबदारी पडली. धोनीच्या षटकारांनी त्याचे चाहते खुश झाले असले तरी बारकाईने पाहिल्यास, वेगवान गोलंदाजांसमोर गियर बदलण्यात तो असमर्थ ठरत असल्याचे दिसून येते. टॉम करणची मध्यमगती सुरू झाल्यावर मात्र त्याने आक्रमण सुरू केले, तेदेखील सामना हातातून पूर्णपणे गेल्यानंतर. दुबईतील मैदान मोठे असल्याने शुक्रवारच्या सामन्यात त्याला स्ट्राईक रोटेट करण्यावर त्याला भर द्यावा लागेल.

दिल्लीसाठी पहिल्याच सामन्यात थरारक विजय मिळविला असल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. मात्र खांद्याच्या दुखापतीमुळे आर.अश्विन या सामन्यातही खेळू शकणार नसल्याने गोलंदाजी लाईनअपमध्ये त्यांना थोडा बदल करावा लागणार आहे.

तो सरावासाठी येत असला तरी फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांच्या निर्णयानंतरच त्याला संघात सामील करून घेण्याबाबत ठरविले जाईल, असे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक मोहम्मद कैफ यांनी सांगितले.

तो न खेळल्यास अक्षर पटेलच्या साथीला अमित मिश्राला खेळविले जाईल.

जलद गोलंदाज मोहित शर्माची कामगिरी यावरही त्यांना विचार करावा लागणार आहे. मागील सामन्यात मोहितने पंजाबच्या केएल राहुलला लवकर बाद केले असले तरी अखेरच्या टप्प्यात त्याने खराब गोलंदाजी केल्याने दिल्लीची अडचण वाढली होती. पण रबाडाने एका बाजूने अचूक मारा केल्याने त्यांना त्याचा फायदा झाला. अखेरच्या 10 षटकांत फटकेबाजी करणे हे चेन्नईचे नेहमीचे धोरण असते. हे लक्षात घेऊन दिल्ली कॅपिटल्स मोहितच्या जागी हर्शल पटेलला संघात स्थान देण्याची शक्यता वाटते. तो कोणत्याही क्रमांकावर उत्तम फलंदाजीही करू शकतो. इशांत शर्मा घोटय़ाच्या दुखापतीतून बरा झाला असला तरी त्याला खेळविण्याची घाई करणार नसल्याचे कैफनी सांगितले.

चेन्नई सुपरकिंग्स : धोनी (कर्णधार), मुरली विजय, रायुडू, डय़ु प्लेसिस, वॅटसन, केदार जाधव, ड्वेन ब्रॅव्हो, जडेजा, एन्गिडी, दीपक चहर, चावला, इम्रान ताहिर, सँटनर, हॅझलवुड, शार्दुल ठाकुर, सॅम करण, एन. जगदीशन, केएम असिफ, मोनू कुमार, आर.साई किशोर, रुतुराज गायकवाड, कर्ण शर्मा.

दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), आर. अश्विन, धवन, पृथ्वी शॉ, हेतमेयर, रबाडा, रहाणे, अमित मिश्रा, रिषभ पंत, इशांत शर्मा, अक्षर पटेल, संदीप लामिछने, कीमो पॉल, डॅनियल सॅम्स, मोहित शर्मा, ऍन्रिच नॉर्ट, ऍलेक्स कॅरे, अवेश खान, तुषार देशपांडे, हर्शल पटेल, स्टोईनिस, ललित यादव. सामन्याची

वेळ : सायं. 7.30 पासून, थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.

Related Stories

खाद्यतेल होणार स्वस्त, सरकारकडून पामतेलावरील आयात शुल्कात मोठी कपात

Archana Banage

हॉकी फाईव्ह स्पर्धेत भारतीय संघांची सत्त्वपरीक्षा

Patil_p

पंतप्रधान मोदींनी छत्रपती संभाजीराजेंना भेटीसाठी वेळ का दिली नाही; संजय राऊतांचा सवाल

Archana Banage

भाजपला राज्यसभेसारखं यश मिळणार नाही, वडेट्टीवारांचा दावा

Archana Banage

तिसऱया खेलो इंडिया युथ स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

Patil_p

राष्ट्रकुल स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया महिला संघ जाहीर

Patil_p