Tarun Bharat

दिल्ली : कोरोनाग्रस्तांचा आकडा 5.78 लाख पार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


दिल्लीत दिवसभरात 3 हजार 944 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 82 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 लाख 78 हजार 324 वर पोहचली आहे. यामधील 30,302 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 5,329 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 5 लाख 38 हजार 680 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 9,342 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 64 लाख 25 हजार 470 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 36,370 आरटीपीसीआर टेस्ट आणि 42,579 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत. 


सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 5.00 % आहे. तर 5772 झोन आणि 322 कंट्रोल रूम आहेत. 

Related Stories

भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Patil_p

मराठी भाषेचे वैभव वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे : डॉ. ज्ञानेश्वर मुळे

prashant_c

भारतीय दौऱयातून जोनासेन बाहेर

Patil_p

रेपो रेटमध्ये वाढ; कर्ज महागणार

Archana Banage

म्हैसूर दसरोत्सव उद्घाटन होणार राष्ट्रपतींच्या हस्ते

Patil_p

टीव्हीसमोर देशवासीयांची माफी मागा; नुपूर शर्माला SC ने फटकारले

Archana Banage