Tarun Bharat

दिल्ली : कोरोनामुळे पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू

Advertisements

ऑनलाईन टीम नवी / दिल्ली :

देशात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दिल्लीतील स्थिती देखील चिंताजनक आहे. त्यातच दिल्लीत एका 31 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर पश्चिम दिल्लीतील भरतनगर पोलीस स्टेशनमध्ये तैनात असलेल्या कॉन्स्टेबलला दोन तीन दिवसांपासून ताप आणि घशाला त्रास जाणवत होता. त्यामुळे त्याला राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याची  कोरोना चाचणी करण्यात आली. पण त्याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 


पण बुधवारी दुपारी त्याचे रिपोर्ट आले असता तो कोरोना पॉझिटिव्ह आला त्यामुळे त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाला असल्याचे  निष्पन्न झाले. 


याबाबत अधिक माहिती देताना उत्तर-पश्चिम दिल्लीचे सह पोलीस आयुक्त विजयंता आर्य यांनी संगतले की, या कॉन्स्टेबलची प्रकृती गेले काही दिवस बिघडली होती. त्यामुळे त्याला सुरवातीला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर तब्येत ताप व खोकल्याचा त्रास जाणवायला लागल्यावर त्याला लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

हा कॉन्स्टेबल विवाहित असून त्याला तीन वर्षांचा एक मुलगा आहे. दरम्यान, मृत कॉन्स्टेबलच्या संपर्कात असलेल्या कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. असं त्यांनी यावेळी सांगितले. 

Related Stories

अमरनाथ यात्रेला २ वर्षांनंतर पुन्हा सुरुवात; सुरक्षेत वाढ

Abhijeet Khandekar

अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेशी संबंध तोडले : डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Tousif Mujawar

अयोध्या : राम मंदिरासाठी 12 टेस्ट पिलर तयार

datta jadhav

राजू शेट्टींना विधान परिषदेवर नियुक्त करण्यात अडचण?, अजित पवार म्हणाले…

Archana Banage

तूर्तास नवा पक्ष नाही, तीन महिन्यानंतर विचार: प्रशांत किशोर

Archana Banage

लखीमपूर खेरी प्रकरण पूर्वनियोजित

Patil_p
error: Content is protected !!