Tarun Bharat

दिल्ली दंगल प्रकरणी पहिली शिक्षा

घर पेटविल्याप्रकरणी एकाला 5 वर्षांची शिक्षा

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

दिल्ली दंगलीप्रकरणी पहिली शिक्षा झाली आहे. एका न्यायालयाने फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या दंगलींप्रकरणी गुरुवारी दिनेश यादव नावाच्या व्यक्तीला 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश वीरेंद्र भट यांनी मागील महिन्यात स्वतःच्या निर्णयामध्ये दिनेश यादवला एका घराला पेटवून देणाऱया दंगलखोरांच्या जमावात सामील असल्याप्रकरणी दोषी ठरविले होते.

या दंगलींप्रकरणी पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीला शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच न्यायालयाने गुन्हेगाराला 12 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सुमारे 150-200 जणांच्या जमावाने घरावर हल्ला केल्याचा आरोप पीडित व्यक्तीने केला होता. उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये फेब्रुवारी 2020 मध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याचे समर्थक आणि विरोधक यांच्यात हिंसाचाराने सांप्रदायिक दंगलींचे रुप धारण केले होते. या दंगलींमध्ये कमीत कमी 54 जणांना जीव गमवावा लागला होता. तर 700 हून अधिक जण जखमी झाले होते.

Related Stories

कोरोनासंबंधी केंद्र सरकारकडून राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी

Patil_p

केरळ सरकारकडून साप पकडण्याचे प्रशिक्षण

Patil_p

लष्कराच्या इंजिनिअर्सनी 72 तासात गलवान नदीवर उभारला पूल

datta jadhav

खासदारांच्या सुविधेकरता एअरलाइन कंपन्यांना पत्र

Patil_p

पाच वर्षात आठपट वाढली कमाई

Patil_p

देशात 2.07 लाख रुग्णांची कोरोनावर मात

datta jadhav