Tarun Bharat

दिल्ली : दिवसभरात 3 हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


मागील 24 तासात दिल्लीत 3 हजार 188 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 57 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 लाख 97 हजार 112 वर पोहचली आहे. यामधील 22,310 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 
दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 3,307 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 5 लाख 65 हजार 039 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 9,763 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

 
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 68 लाख 69 हजार 328 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 31,098 आरटीपीसीआर टेस्ट आणि 44,311 रैपिड एंटिजेन टेस्ट सोमवारी एका दिवसात करण्यात आल्या आहेत. 

Related Stories

राज्यात एकाच दिवशी 14 संसर्गमुक्त

Patil_p

राजेंद्र पाटील-यड्रावकरांच्या समर्थनात जयसिंगपुरात कार्यकर्त्यांचं शक्तिप्रदर्शन

Abhijeet Khandekar

राज्याच्या विकासाला गती देणे हे माझे मुख्य उद्दिष्ट: मुख्यमंत्री बोम्माई

Archana Banage

राजस्थान : गेहलोत सरकारविरोधात भाजप आणणार अविश्वास ठराव

datta jadhav

ज्ञानवापी मशिदीच्या आत सर्वेक्षण करण्याची अनुमती

Amit Kulkarni

सीबीएसई दहावी-बारावीचा निकाल 15 जुलैला लागणार

Patil_p
error: Content is protected !!