Tarun Bharat

दिल्ली : दिवसभरात 384 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


दिल्लीत दिवसभरात 384 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 27 हजार 256 वर पोहचली आहे. यामधील 4, 689 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 727 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 11 हजार 970 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 10,597 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

 
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 89 लाख 26 हजार 806 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 30,296 आरटीपीसीआर टेस्ट आणि 19,992 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत. 

Related Stories

आठ आदिवासी गटांशी आसाममध्ये शांतता करार

Amit Kulkarni

रात्री विवाह, सकाळी वैधव्य

Patil_p

गँगस्टर बिश्नोईची याचिका फेटाळली

Amit Kulkarni

उत्तर प्रदेशच्या आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

Tousif Mujawar

हिंदुस्थान पेट्रोलियमला 2172 कोटीचा तोटा

Patil_p

मद्यपीने माणसाचाच दिला बळी

Patil_p