Tarun Bharat

दिल्ली बुल्स संघाची विजयी सलामी

वृत्तसंस्था/ अबुधाबी

येथील झाएद क्रिकेट स्टेडियमवर सुरू झालेल्या अबुधाबी टी-10 लीग क्रिकेट स्पर्धेत दिल्ली बुल्स संघाने नॉर्दर्न वॉरियर्सचा 6 गडय़ांनी पराभव करत विजयी सलामी दिली. दिल्लीच्या विजयामध्ये गुरुबाज आणि रुदरफोर्ड यांची फटकेबाजी महत्त्वाची ठरली.

या सामन्यात दिल्ली बुल्सने नाणेफेक जिंकून नॉर्दर्न वॉरियर्सला प्रथम फलंदाजी दिली. नॉर्दर्न वॉरियर्सने 10 षटकात 4 बाद 107 धावा जमविल्या. मोईन अलीने 35 तर विंडीजच्या आर. पॉवेलने 38 धावा जमविल्या. दिल्ली बुल्सतर्फे शिराज अहमदने 16 धावांत 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना दिल्ली बुल्स संघातील रहिमतुल्ला गुरुबाजने 10 चेंडूत 30 तर रुदरफोर्डने 15 चेंडूत 29 धावा झोडपल्या. नॉर्दर्न वॉरियर्सतर्फे अभिमन्यू मिथुनने 16 धावांत 1 गडी बाद केला. दिल्ली बुल्सने 5 षटकाअखेर 2 बाद 58 धावांपर्यंत मजल मारली होती. दिल्ली बुल्सने हा सामना 2 चेंडू बाकी ठेवून जिंकला.

संक्षिप्त धावफलक

नॉर्दर्न वॉरियर्स- 10 षटकात 4 बाद 107 (मोईन अली 35, आर. पॉवेल 38, शिराज अहमद 1-16), दिल्ली बुल्स- 9.4 षटकात 4 बाद 110 (गुरुबाज 30, मोहम्मद हाफिज 31, मिथुन 1-16).

Related Stories

भारतातील विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याचा पीसीबीचा इशारा

Patil_p

थिएम अंतिम फेरीत, व्हेरेव्ह स्पर्धेबाहेर

Patil_p

पै.पृथ्वीराज पाटीलची सिनियर वर्ल्ड चॅम्पियनशीप कुस्ती स्पर्धेसाठी निवड

Archana Banage

विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताची साफ निराशा

Patil_p

Tokyo Olympics 2020: बॉक्सर पूजा राणीची उपांत्यपूर्व फेरीत धडक, दीपिका कुमारीही विजयी

Archana Banage

निवड चाचणी स्पर्धेत ऐश्वर्य तोमर विजेता

Amit Kulkarni
error: Content is protected !!