Tarun Bharat

दिल्ली-मडगाव रेल्वे 15 पासून धावणार

प्रतिनिधी / मडगाव

राजधानी एक्सप्रेसच्या मडगाव विशेष रेलगाडय़ा शुक्रवार दि. 15 मे पासून सुरू होत आहे. मडगाव स्पेशल टेन नवी दिल्लीहून शुक्रवारी आणि शनिवारी आणि मडगावहून रविवारी, सोमवारी धावणार आहेत. पहिल्या दोन गाडय़ा गोव्यासाठी शुक्रवार दि. 15 व शनिवार दि. 16 मे रोजी दिल्लीहून सुटतील.

गोव्याची पहिली टेन रविवार दि. 17 आणि दुसरी सोमवार दि. 18 मे रोजी सुटेल. रेल्वेने घोषित केल्याप्रमाणे या गाडय़ा पुढील प्रमाणे थांबे घेतील. रत्नागिरी, पनवेल, वडोदरा जंक्शन आणि कोटा जंक्शन या गाडय़ांमध्ये आरक्षणासाठी बुकिंग फक्त आयआरसीटीसी वेबसाइटवर (//www.irctc.co.in/) ऑनलाईन मोडमध्ये उपलब्ध आहे. रेल्वे स्थानकांवर तिकिट बुकिंग काउंटर बंद राहतील व कोणतीही काउंटर तिकिट (प्लॅटफॉर्म तिकिटांसह) दिली जाणार नाही.

केवळ वैध (कन्फर्म) तिकिट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार आहे. आजपासून हळूहळू प्रवासी रेल्वेगाडय़ा पुन्हा सुरू करण्याची भारतीय रेल्वेची योजना आहे.

सर्व प्रवाशांची तपासणी होणार

 या विशेष रेलगाडय़ातून येणाऱया प्रवाशांची तपासणी करण्याची सर्व जबाबदारी असल्याची माहिती कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली. सद्या तरी मडगाव कोकण रेल्वे स्थानकांवर या विशेष रेलगाडय़ासदंर्भात कोणतीच माहिती नाही. रेल्वे तिकिटाचे आरक्षण हे पूर्णपणे ऑनलाईन असल्याने रेल्वे स्थानकावर सामसूम आहे.

या विशेष गाडय़ामुळे गोव्याला कोरोना व्हायरसचा धोका असल्याच्या प्रतिक्रिया सर्व स्तरांतून व्यक्त होऊ लागल्या आहेत. सरकारने या रेलगाडय़ा सुरू करण्यापूर्वी संभाव्य धोका ओळखावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. सद्या गोवा हरित विभागात असून तो तांबडय़ा विभागात जाऊ नये अशीच सर्वांची इच्छा आहे.

Related Stories

अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी खाणकाम पुन्हा सुरू करणे महत्त्वाचेः पी चिदंबरम

Amit Kulkarni

तृणमूलने मांडला फसव्या योजनांचा बाजार

Amit Kulkarni

आलेक्स लॉरेन्सो यांचा भाजपाला बिनशर्त पाठिंबा

Amit Kulkarni

गोवा षष्ठय़ब्ध्दी सोहळ्य़ास राष्ट्रपतींची खास उपस्थिती

Patil_p

शिरडीत ‘लॉकडाऊन’, शिरगावात ‘कोरोन्टाईन’!

tarunbharat

आयआयटी प्रकल्पाबाबत यु टर्न ?

Patil_p