Tarun Bharat

दिल्ली : मागील 24 तासात 7 मृत्यू; 135 नवे कोरोना रुग्ण

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. यासोबत दररोज वाढत असलेले मृत्यूंची संख्या देखील कमी होताना दिसत आहे. ताज्या आकडेवारीनुसार मागील 24 तासात केवळ 135 नवे रुग्ण आढळून आले असून 07 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 201 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. 

  • सद्य स्थितीत संसर्ग दर 0.18 %


आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 14 लाख 32 हजार 168 वर पोहोचली आहे. त्यातील 14 लाख 04 हजार 889 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य स्थितीत संसर्ग दर 0.18 % इतका आहे. तर आतापर्यंत 24,907 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सद्य स्थितीत 2 हजार 372 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील 1479 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. कोविड केअर केंद्रात 80 जण आहेत. तर 668 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. दिल्लीत आतापर्यंत जवळपास 2 कोटी 07 लाख 02 हजार 001 टेस्ट करण्यात आल्या आहेत. यातील 53,942 आरटीपीसीआर टेस्ट आणि 21,745 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत दिल्लीत 5,261 झोन आहेत.

Related Stories

पंतप्रधान मोदी आज उत्तरप्रदेशच्या दौऱ्यावर

Amit Kulkarni

सोलापुरात आणखी एकास कोरोनाची लागण, 66 जणांचे अहवाल निगेटिव्ह

Abhijeet Shinde

उत्तर प्रदेश : श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या अध्यक्षांना कोरोनाची बाधा

Rohan_P

राज्यातील रुग्णसंख्या 1462 वर

Patil_p

कर्नाटक : काहींना येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदी नको आहेत : मंत्री ईश्वरप्पा

Abhijeet Shinde

पंजाबमध्ये आरडीएक्स हस्तगत, एकाला अटक

Patil_p
error: Content is protected !!