Tarun Bharat

दिल्ली येथील परेड साठी अमोद माळवी याची निवड

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे होणार्‍या परेड व पंतप्रधान रॅलीसाठी महावीर महाविद्यालयातील 1 महाराष्ट्र आर्टीलरी बॅटरी एन.सी.सी. युनीटमधील सिनीअर अंडर ऑफिसर अमोद संजय माळवी याची निवड झाली. या निवड प्रक्रियेमध्ये कोल्हापूर एन.सी.सी. गटमुख्यालय स्तर, पुणे राज्यस्तरीय निवड अशा दोन ठिकाणी निवड चाचणी घेण्यात आली. प्रत्येक स्तरावर अमोदने उत्कृष्ट कामगीरी केल्याने अंतिम प्रजासत्ताक परेडसाठी त्याची निवड करण्यात आली. तो बी.एस्सी. भाग-2 वर्गात शिकत आहे.

अमोदला कोल्हापूर एन. सी. सी. ग्रुप कमांडर ब्रिगेडिअर आर. के. सिंग, लेप्टनंट कर्नल संजीव सरनाईक, संस्थेचे चेअरमन ऍड. के. ए. कापसे, सेक्रेटरी मोहन गरगटे, प्राचार्य डॉ. आर. पी. लोखंडे, लेप्टनंट उमेश वांगदरे, लेप्टनंट डॉ. सुजाता पाटील, सीटीओ अश्विनी कोटणीस, सुभेदार मेजर मुकेशकुमार यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. या निवडीबद्दल माळवीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Stories

सातारा: जिल्ह्यातील २२० संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह तर ३ बाधितांचा मृत्यू

Archana Banage

गणेशोत्सव साहित्य खरेदीत ‘मेड इन इंडिया’ला अधिक पसंती

Patil_p

आधी ग्रेडसेपरेटर सुरु करा

Patil_p

ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने घेतला अखेरचा श्वास

Abhijeet Khandekar

सडोली खालसा येथे एक महिला पॉझिटिव्ह

Archana Banage

श्री क्षेत्र नृसिंहवाडीला होणार ‘ब्राह्मण परिवार महाअधिवेशन’

Archana Banage
error: Content is protected !!