Tarun Bharat

दिल्ली येथे होणाऱया पहिल्या राष्ट्रीय ग्रेपलिंग स्पर्धेसाठी गोवा संघ रावाना

मगो नेते प्रवीण आर्लेकर यांना दिल्या खेळाडूना शुभेच्छा : 20 ते 22 ऑक्टोबर दरम्यान होणार स्पर्धा

प्रतिनिधी /पेडणे 

दिल्ली येथे होणाऱया पहिल्या राष्ट्रीय  ग्रेपलिंग स्पर्धेसाठी गोवा संघ मंगळवारी रवाना  झाला .पेडणे मतदारसंघाचे  मगो नेते तथा समाजसेवक प्रवीण आर्लेकर व इतर मान्यवरांनी  दिल्या खेळाडूना शुभेच्छा.

इंदिरा गांधी स्टेडियम दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली पहिली राष्ट्रीय ग्रेपलिंग  स्पर्धा   20, 21 व 22 आ?क्टोबर असे तीन दिवस  होणार आहे.या स्पर्धेसाठी  ना?गीच्या विविध वजनी गटात सहभागी  होण्यासाठी  गोव्याच्या 25 खेळांडूची शिकेरी मये येथे सराव शिबिर घेऊन निवड करण्यात आली होती.

गोव्याच्या संघात वैयक्तिक पुरुष गटात विराज तुकाराम वीर , परबिंदरा सुरेंद्र  राजवर ,जयकांत लक्षी बारीक, अमिश कमलनाथ पाञा, शहिद जहिर फरिद्दिन,दिप्तेश दत्ता परब, साहील संदिप पेडणेकर, जा?यल एन्ट?नी ग्रासियस, साईप्रसाद सुधाकर वेळिप, लक्ष्मण रत्नाकांत सावंत, किसन बाबूराव गावस व केलिन फिलोनी कोल्याको व प्रशिक्षक सनी मोहिंदुरु  (हरियाणा ) .

मुलीच्या विभागात शिल्पा फोंडू वेळिप, दिया धोलो वेळिप, गौतृमी जयवंत जुवेकर व रुक्मा सखाराम फाळे यांची निवड झाली. प्रशिक्षक म्हणून भावना चोडणकर तर म?नेजर म्हाणून  साधना हरमलकर यांची निवड झाली.

या संघासोबत गोवा ग्रेपलिंग संघटनेचे अध्यक्ष संदिप पेडणेकर , सरचिटणीस जयवंत बोभाटे , सचिव नारायण मराठे, कोषाध्यक्ष संजय म्हापसेकर, उत्तर गोवा उपाध्यक्ष शिवराम तुकोजी, उत्तर गोवा सचिव किशोर किनळेकर, सदस्य गौतम राऊळ, प्रताप देसाई, सदानंद कडोली , तांञिक अधिकारी तसेच इतर पदाधिकारी मिळून 35 जण रवाना झाले.

खेळाच्या आणि खेळाडूंच्या उत्कर्षासाठी आपण नेहमीच पुढे असणारः प्रवीण आर्लेकर

  दिल्ली येथे होणाऱया राष्ट्रीय ग्रेपलिंग पहिल्या  स्पर्धेसाठी गोव्याचा संघ खेळण्यासाठी जातो ही गोमंतकीयाच्या दृष्टीने  आनंदाची बाब असून खेळाच्या उत्कर्षासाठी आणि खेळाडूंच्या उत्कर्षासाठी आपले नेहमीच सहकार्य असणार आहे. आपण आमदार म्हणून निवडून आल्यास खेळाडूंना आणि खेळाला नवचैतन्य निर्माण करणार असल्याचे मगो नेते प्रविण आर्लेकर म्हणाले .गोव्याच्या संघाने विजयी होऊन गोवा राज्याचे नाव उज्वल करावे अशा शुभेच्छा यावेळी प्रवीण आर्लेकर यांनी खेळडूंना दिल्या. पेडणे येथे खेळडूंच्या  संघाला निरोप देण्यासाठी आणि गणवेश वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने मगो नेते प्रविण आर्लेकर बोलत होते.

यावेळी गोवा राज्य ग्रेपलिंग असोसिएशनचे अध्यक्ष संदिप पेडणेकर, सरचिटणीस जयवंत बोबटे, सह सचिव नारायण मराठे, कोषाध्यक्ष संजय म्हापसेकर, उत्तर गोवा उपाध्यक्ष शिवराम तुकोजी, उत्तर गोवा सचिव किशोर किनळेकर, उत्तर गोवा खजिनदार महादेव गवंडी,   सदस्य गौतम राऊळ, प्रताप देसाई, सदानंद कडोली , मगो कार्यकारिणी सदस्य सुदिप कोरगावकर , उपसरपंच सुबोध महाले, नरेश कोरगावकर देवानंद गावडे, आवेलिन रा?ड्रिग्स, जयेश पालयेकर, महेश परब,  देविदास नागवेकर , राजन म्हापसेकर आदी उपस्थित  होते.

यावेळी संदिप पेडणेकर, सुबोध महाले, सुदिप कोरगावकर, आवेलिनो रा?ड्रिग्स आदीनी यांनी खेळाडूना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रवीण आर्लेकर यांनी खेळाडूना दिलेले गणवेश यांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूञसंचालन किशोर किनळेकर यांनी केले. सरचिटणीस जयवंत बोबटे यांनी पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱया खेळाडूंना गणवेश देऊन सहकार्य केल्याबद्दल प्रवीण आर्लेकर यांना धन्यवाद दिले.

Related Stories

पाण्याच्या वाढीव बिलांच्या प्रश्नावर वास्कोत पुन्हा गदारोळ, गरीब व मध्यमवर्गीय चिंतेत

Amit Kulkarni

दहावी, बारावीचे वर्गही ‘अनलॉक’

Patil_p

समाजकार्यकर्ती रेवती यांचा असोळणे येथे सत्कार

Amit Kulkarni

उमेदवारीच्या स्वयंघोषणेचा अधिकार कुणालाच नाही

Amit Kulkarni

स्विफ्ट कार-क्रेन अपघातात युवक ठार

Amit Kulkarni

दाभाळच्या उण्णै नदीला पूर

Amit Kulkarni