Tarun Bharat

दिल्ली : सोनिया गांधी यांची प्रसूती करणाऱ्या डॉक्टरांचे कोरोनाने निधन

  • काँग्रेस महासचिवांची भावनिक पोस्ट 


ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दररोज मोठ्या संख्येने मृत्यू होत आहेत. त्यातच आता काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रसूती करणाऱ्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. एस.के. भंडारी यांचे कोरोनाने निधन झाले आहे. त्या 86 वर्षांच्या होत्या.


दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात मागील 46 वर्षे डॉ. एस. के. भंडारी सेवा दिली आहे. डॉ. भंडारी यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. तसेच त्यांना दोन आठवड्यांपूर्वी ह्रदयाशी संबंधित त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांना संसर्ग झाला असल्याचे निष्पन्न झाले. कोरोनामुळे गुंतागुंत निर्माण झाली होती. कोरोनामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यातच गुरूवारी त्याचा मृत्यू झाला, असे सर गंगा राम रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. डी.एस. राणा यांनी सांगितले.


डॉ. भंडारी यांनी प्रियांका गांधी यांचीही प्रसूती केली होती. डॉ. भंडारी यांच्या निधनाचे वृत्त कळाल्यानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी भावूक झाल्या. त्यांनी ट्विट करत आठवणींना उजाळा दिला. त्या आपल्या ट्विट मध्ये म्हणाल्या की, माझा भाऊ (राहुल गांधी), मी आणि माझा मुलगा व मुलीची डिलिव्हरी करणाऱ्या सर गंगा राम रुग्णालयातील सेवानिवृत्त डॉ. एस. के. भंडारी यांचे निधन झाले आहे.


पुढे त्या म्हणाल्या की, वयाच्या सत्तरीतही त्या सकाळी सकाळी रुग्णालयात हजर होत असत. शेवटपर्यंत त्यांनी आपल्यातील गुणांना कायम ठेवले. एक अशी महिला जिचा मी नेहमीच सन्मान आणि स्तुती करत आले. एक मैत्रिणी जिची आठवण कायम येत राहिल, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. 

Related Stories

लखीमपूर हिंसाचार : मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी योगी सरकारची मोठी घोषणा

Archana Banage

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

prashant_c

खेडा सीमेवरील शेतकरी आंदोलन 35 महिने चालणार

datta jadhav

टेरर फंडिंगप्रकरणी काश्मिरी पत्रकाराला अटक

Patil_p

सांबा रोडवर कार दरीत कोसळून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Archana Banage

राबडीदेवींवर आधारित वेबसीरिज

Patil_p