Tarun Bharat

दिल्ली विमानतळावर 45 पिस्तुले जप्त

Advertisements

दाम्पत्याला अटक ः व्हिएतनाममधून तस्करी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका दाम्पत्याकडून 45 पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. हे दाम्पत्य व्हिएतनामहून भारतात परतले होते. विमानतळावर झडती घेतली असता दोन ट्रॉली बॅगमधून पिस्तुले आणि शस्त्रे जप्त करण्यात आली. जगजीत सिंग आणि जसविंदर कौर अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून ते पती-पत्नी आहेत. या दाम्पत्याने पिस्तुलांच्या तस्करीत सहभाग असल्याची कबुली दिली आहे. आता त्यांची अधिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात पिस्तुले सापडल्यामुळे तपास यंत्रणाही चक्रावून गेल्या आहेत. सध्या एनएसजी या पिस्तुलाच्या बॅलेस्टिक चाचण्या घेत आहे. बंदुका पूर्णपणे खऱया दिसत आहेत. तरीही त्यांची योग्य शहानिशा तपासात उघड होईल.

पिस्तुलांसह अटक करण्यात आलेले दाम्पत्य 10 जुलै रोजी व्हिएतनामहून भारतात परतले होते. अधिकाऱयांनी जगजीत सिंगला दोन ट्रॉली बॅगमध्ये पिस्तुलसह पकडले असून त्याने आपला भाऊ मनजीत सिंग याने ती दिल्याचे चौकशीत सांगितले. जप्त करण्यात आलेल्या बंदुकांची एकूण किंमत 22 लाख 50 हजार रुपये आहे. दोन्ही आरोपींनी यापूर्वी तुर्कीतून 25 पिस्तूल भारतात आणल्याची कबुली दिली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Related Stories

सर्वंकष विकासावर भर

Patil_p

…अन् मोदींना आश्चर्याचा धक्काच बसला

datta jadhav

बालकांचा व्यक्तिमत्त्व विकास आवश्यक

Patil_p

जम्मू काश्मीरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Tousif Mujawar

रुग्णांच्या रक्तनमुन्यात शिसे अन् निकेल धातू

Patil_p

दिल्लीत कोरोना नियंत्रणात असल्याचा दावा

Patil_p
error: Content is protected !!