Tarun Bharat

दिल्ली विमानफेरीमुळे वेळापत्रकात होणार बदल

राजधानीला दररोज विमानफेरी सुरू होणार

प्रतिनिधी /बेळगाव

दिल्ली-बेळगाव-दिल्ली ही विमानफेरी दि. 27 मार्चपासून आता दररोज असणार आहे. यासाठी स्पाईसजेट कंपनीने वेळापत्रकात बदल केला आहे. नव्या वेळापत्रकानुसार स्पाईसजेटच्या दिल्ली, हैदराबाद व मुंबई फेऱया सुरू होणार आहेत. देशाच्या राजधानीला यापुढे दररोज विमानफेरी सुरू असणार आहे. प्रवाशांनी आतापासूनच बुकिंग सुरू केले आहे.

सकाळी 6.05 वा. दिल्ली येथून उड्डाण घेतलेले विमान सकाळी 8.45 वा.  बेळगाव विमानतळावर पोहोचणार आहे. सकाळी 9.15 वा. बेळगाव विमानतळावरून निघालेले विमान सकाळी 11.45 वा. दिल्लीला पोहोचणार आहे. सकाळी 9.50 वा. हैदराबाद येथून निघालेले विमान सकाळी 11.05 वा. बेळगावला पोहोचणार आहे. सकाळी 11.25 वा. बेळगाव विमानतळावरून ते मुंबईला जाण्यास निघेल आणि दु. 12.45 वा. मुंबई विमानतळावर पोहोचेल. दु. 1.15 वा. मुंबई येथून निघालेले विमान दुपारी 2.25 वा. बेळगावला पोहोचून दु. 2.45 वा. बेळगाव विमानतळावरून उड्डाण करून सायं. 4.10 वा. हैदराबाद विमानतळावर पोहोचेल.

विमानांच्या संख्येत होणार वाढ

सध्या बेळगावमधून दिल्ली, बेंगळूर, हैदराबाद, मुंबई, पुणे, इंदूर, जोधपूर, तिरुपती, अहमदाबाद या शहरांना विमानसेवा सुरू आहे. आता दररोज दिल्लीला बोईंग विमान ये-जा करणार असल्यामुळे प्रवासी संख्येसह विमानाच्या संख्येतही वाढ होणार आहे. सध्या 6 ते 7 विमाने बेळगावला येत असून दिल्ली विमानफेरीमुळे वाढ होणार आहे.

Related Stories

बस्तवाड (हलगा) मध्ये बटाटे बियाणे कुजल्याने शेतकरी चिंतेत

Patil_p

पॉझिटीव्ह महिलांचा चार दिवसात निगेटिव्ह अहवाल

Patil_p

खानापूर तालुका माजी सैनिक संघटनेची बैठक

Patil_p

शुक्रवारी 135 जणांनी केली कोरोनावर मात

Patil_p

सुपारी खूनप्रकरणी आणखी चौघा जणांना अटक

Omkar B

दुधाची तहान पोहोचली सोन्याच्या हव्यासापर्यंत!

Amit Kulkarni