Tarun Bharat

दिल्ली विमानफेरीला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद

प्रतिनिधी /बेळगाव

दिल्ली-बेळगाव-दिल्ली ही विमानफेरी रविवारपासून दररोज सेवा देणार आहे. पहिल्याच दिवशी या विमानफेरीला उत्तम प्रतिसाद मिळाला. 281 प्रवाशांनी या विमानाने प्रवास केला. स्पाईसजेटच्या या सेवेमुळे आता दररोज बेळगाव-दिल्ली असा प्रवास करणे सोयीचे होणार आहे.

रविवारी सकाळी 6 वा. दिल्ली येथील विमानतळावरून 114 प्रवासी घेऊन बोईंग विमान बेळगावला पोहोचले, तर बेळगावमधून 167 प्रवासी दिल्लीला गेले. विमानफेरी सुरू करण्यात आल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

ट्रू जेटची सेवा अद्याप बंदच : म्हैसूर, कडप्पा शहरांची सेवा ठप्प

ट्रूजेट या विमान कंपनीच्या सर्व सेवा अद्याप बंद आहेत. या कंपनीने बेळगावमधून चार शहरांना उडान अंतर्गत सेवा दिल्या होत्या. परंतु कंपनीच्या तांत्रिक कारणामुळे या सेवा अद्याप ठप्प आहेत. ट्रूजेटने आपली सेवा बंद केल्यामुळे म्हैसूर व कडप्पा या दोन शहरांचा संपर्क तुटला आहे.

हैदराबाद येथील टर्बो मेगा (ट्रूजेट) या विमान कंपनीला उडान 3 अंतर्गत बेळगावमधून चार मार्ग मंजूर झाले होते. त्यामुळे सवलतीच्या दरात या कंपनीने आपली सेवा सुरू ठेवली होती. बेळगाव-हैदराबाद, बेळगाव-तिरूपती, बेळगाव-कडप्पा, बेळगाव-म्हैसूर या चार शहरांना विमानसेवा सुरू होती. परंतु ऑक्टोबर 2021 पासून तांत्रिक कारण देत कंपनीने या चारही शहरांना सेवा बंद केली आहे. हैदराबादला स्पाईसजेट व इंडिगो या दोन कंपन्या सध्या सेवा देत आहेत. तर तिरूपतीला स्टार एअर सेवा देत आहे. यंदाच्या उन्हाळी मोसमाचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये ट्रूजेटला स्थान नसल्यामुळे म्हैसूर व कडप्पा या शहरांचा संपर्क तुटला असल्याने आहे.

Related Stories

केएलई फार्मसी कॉलेजतर्फे क्षयरोग जागृती शिबिर

Amit Kulkarni

बाराव्या एम. के. नंबियार मुटकोर्टचे 11 रोजी उद्घाटन

Amit Kulkarni

सांगेतून 300 नवीन शेतकरी कृषी क्षेत्रात उतरावेत हे उद्दिष्ट

Patil_p

कमानीचा मामला, सरकारी वेशीला टांगला!

Omkar B

स्कूल बसची नियमावली धाब्यावर

Amit Kulkarni

तालुक्यात भक्तिमय वातावरणात महाशिवरात्रीचा जागर

Amit Kulkarni