Tarun Bharat

दिल्ली सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दारू नंतर आता दिल्ली सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती महाग झाल्या आहेत. दिल्ली सरकारने वाहनाच्या इंधनावरील व्हॅट करामध्ये 30 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली सरकारने पेट्रोलवरील व्हॅट कर 27 टक्क्यांवरून 30 टक्‍क्‍यांपर्यंत वाढवला आहे. तर डिझेलवरील व्हॅट 16.75 टक्क्यांवरून 30 टक्‍क्‍यांपर्यंत वाढवला आहे. 


त्यामुळे दिल्लीत आज पासून पेट्रोल 1.67 रुपयांनी तर डिझेल 7.10 रुपयांनी महाग झाले आहे. त्यामुळे दिल्लीतील ग्राहकांना आता प्रति लिटर पेट्रोलसाठी 71.26 रुपये  मोजावे लागणार आहेत. याआधी पेट्रोलचा दर प्रति लिटर 69.59 रुपये होता. तर डिझेलचे नवी किंमत 69.39 असणार आहे. याआधी डिझेलची किंमत प्रति लिटरला 62.29 रुपये होती. 


दरम्यान, लॉक डाऊन मुळे पेट्रोल डिझेल ची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजारात दर पडले आहेत. या लॉक डाऊन मुळे अर्थचक्र ठप्प झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये आता सर्व राज्याची पेट्रोल डिझेल विक्री वरच भिस्त असणार आहे. 

Related Stories

राजस्थान काँग्रेसचे दबावतंत्र

Patil_p

चीनने वाढवले संरक्षण बजेट

datta jadhav

महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाकडून नवरात्रौत्सवासाठी नियमावली जाहीर

Rohan_P

आठ नव्या राज्यपालांची नियुक्ती

Patil_p

निर्भया : राष्ट्रपतींनी दया अर्ज फेटाळला, फाशी निश्चित

prashant_c

…तर जालन्यातून निवडणूक लढवू- इम्तियाज जलील

Abhijeet Shinde
error: Content is protected !!