Tarun Bharat

दिल्ली सरकारची पद्म पुरस्कारासाठी शिफारस; केंद्राकडे पाठवली तीन डॉक्टरांची नावे

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दिल्ली आरोग्य कर्मचारांच्या सन्मानार्थ मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी सरकारने देशाच्या सर्वोच्च पुरस्कारासाठी तीन डॉक्टरांची नावे केंद सरकारकडे पाठवली आहेत. याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, आमच्याकडे 9 हजार 427 नागरिकांच्या नावाच्या सूचना मिळाल्या होत्या.

पुढे ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या नेतृत्वामध्ये आमच्या कमिटीने पद्म पुरस्कारासाठी तीन डॉक्टरांची नावे नक्की केली आहेत. यामध्ये आयएलबीएस डॉ. एस. के. सरीन, एलएनजेपी डॉ. सुरेश कुमार आणि मैक्स रूग्णालयातील डॉ. संदीप बुद्धिराजा यांचा समावेश आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी यापूर्वीच घोषणा केली होती की, दिल्ली सरकार पद्म भूषण, पद्म विभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांसाठी जी नावे जनता सांगेल तिच नावे केंद्राकडे पाठवली जाणार आहेत. त्यानुसार या नावांची निवड करण्यात आली आहे.

Related Stories

भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

datta jadhav

गुजरातमध्ये अग्नितांडव! कोविड सेंटरला आग; 16 जणांचा होरपळून मृत्यू

Tousif Mujawar

डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

Patil_p

‘स्पुतनिक व्ही’ लसीचे भारतात उत्पादन सुरु

Archana Banage

गेहलोत ‘बाहेर’, दिग्विजय ‘आत’

Amit Kulkarni

मराठी शुद्धलेखन तज्ज्ञ अरुण फडके यांचे निधन

Tousif Mujawar