Tarun Bharat

दिवंगत वकिलांना बार असोसिएशनतर्फे श्रध्दांजली

प्रतिनिधी / बेळगाव :

गेल्या दीड ते दोन महिन्यांमध्ये अचानक 10 वकिलांचे निधन झाले. यामुळे वकिल क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. बार असोसिएशनचे अध्यक्ष ए. जी. मुळवाडमठ यांच्यासह अनेक ज्ये÷ वकीलांचे निधन झाले. याबद्दल ज्ये÷ वकिलांसह बार असोसिएशनने दु:ख व्यक्त करत या सर्वांना भावनावश होवून श्रध्दांजली वाहिली.

नुकतेच निधन झालेले व्ही. सी. देसाई यांनी एक पत्र लिहिले होते. ते पत्र माझ्या मृत्यूनंतर तुम्ही वाचा असे सांगितले होते. ते पत्र या शोक सभेमध्ये वाचण्यात आले. बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ए. जी. मुळवाडमठ यांचे निधन झाल्याने मला फार दु:ख झाले. ही व्यक्ती दोनवेळा अध्यक्ष झाली. याचबरोबर कर्नाटक बार असोसिएशनचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. ज्युनिअर वकिलांना नेहमीच मदतीचा हात पुढे केला. बेळगावात विविध न्यायालये आणण्यासाठी ते धडपडले. अशा व्यक्तीचे निधन झाले. ही मोठी दुःखद घटना असल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले. हे पत्र वाचताना साऱयांच्या भावनांना बांद फुटला होता.

गेल्या दीड, दोन महिन्यामध्ये ऍड. बी. बी. मेल्लद, ऍड. आय. एस. हखारी, ऍड. अनिलकुमार जे. सौंदत्ती, ऍड. महावीर धुपादली, ऍड. एन. के. मारुतीराव, ऍड. ए. जी. मुळवाडमठ, ऍड. महांतेश जी. कल्लोळी, ऍड. बी. एन. कुग्गण्णावर, ऍड. आर. जी. ज्योती आणि ऍड. व्ही. सी. देसाई यांचे निधन झाले. या सर्वांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली.

आमदार अनिल बेनके, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष सी. टी. मजगी, उपाध्यक्ष गजानन पाटील, जनरल सेपेटरी आर. सी. पाटील, जाईंट सेपेटरी शिवपुत्र फटकळ, ऍड. एम. बी. जिरली, ऍड. एस. बी. शेख, ऍड. दिनेश एम. पाटील, ऍड. एम. एम. माविनकट्टी, ऍड. ए. आर. पाटील, ऍड. व्ही. एस. सुलतानपुरी, ऍड. रमेश देशपांडे यांनी आपले विचार व्यक्त करुन या सर्व वकिलांना श्रध्दांजली वाहिली.

Related Stories

जिव्हाळा परिवारतर्फे विद्यार्थिनींना मदत

Amit Kulkarni

कॅन्टोन्मेंट रुग्णालय बाहय़ रुग्णांसाठी ठरतेय सोयीचे

Amit Kulkarni

पावसामुळे वीजपुरवठा विस्कळीत

Amit Kulkarni

नववीच्या पाठय़पुस्तकात संभाजी महाराजांविषयी चुकीचा उल्लेख

Amit Kulkarni

नैऋत्य रेल्वेचे इंजिन अखेर रूळावर

Patil_p

कर्नाटक सीईटी : शुक्रवारी ६३ कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थी उपस्थित

Archana Banage