Tarun Bharat

दिवसभरातील मृतांच्या आकडय़ात वाढ

देशात चोवीस तासात 3,780 रुग्णांनी गमावला जीव ः 3 लाख 82 हजार नवे बाधित

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत एका दिवसातील सर्वाधिक मृतांचा आकडा समोर आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 3 लाख 82 हजार 315 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 3 हजार 780 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. देशात यापूर्वी 1 मे रोजी 3 हजार 689 सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाला होता.

देशात आतापर्यंत 2 कोटी 6 लाख 65 हजार 148 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. एकंदर रुग्णांपैकी देशात आतापर्यंत 2 लाख 26 हजार 188 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 1 कोटी 69 लाख 51 हजार 731 जणांनी योग्य उपचाराअंती कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी एका दिवसात 3 लाख 38 हजार 439 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. एका दिवसात डिस्चार्ज मिळणाऱयांचा हा सर्वाधिक आकडा आहे. देशात अजूनही 34 लाख 87 हजार 229 रुग्ण उपचाराधीन आहेत. आता देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.03 टक्क्मयांवर पोहोचले आहे.

देशात लसीकरणाचा वेगही वाढताना दिसत आहे. मंगळवारी दिवसभरात 14 लाख 84 हजार 989 लाभार्थींनी लस टोचून घेतली. आतापर्यंत देशात 16 कोटी 4 लाख 94 हजार 188 इतके कोरोनाचे डोस देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

Related Stories

पायल रोहतगी आणि जीशान खानमध्ये जुंपली

Archana Banage

ICSE दहावी, ISC बारावीचे निकाल जाहीर

datta jadhav

उत्तर भारत गारठला; दाट धुक्यामुळे 10 ट्रेन उशीराने

Tousif Mujawar

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सुरू

datta jadhav

विनोद तावडे भाजपचे राष्ट्रीय महासचिव

Patil_p

मुकेश सहनी यांचा भाजपला विरोध

Patil_p