Tarun Bharat

दिवसभरात 2960 कोरोनामुक्त

61 जणांचे बळी : 2455 नवे बाधित

प्रतिनिधी / पणजी

राज्यात कोरोनाबळींची संख्या कमी होण्याचे नाव घेत नसली तरीही बाधित बरे होण्याच्या प्रमाणात मात्र आमुलाग्र बदल दिसून येत आाहे. शुक्रवारी 24 तासात सापडलेल्या एकूण बाधितांच्या संख्येपेक्षा तब्बल 500 जादा रुग्ण बरे झाले आहेत. सध्या बळींची संख्या दोन हजारांच्या उंबरठय़ावर आहे.

काल शुक्रवारी राज्यात 61 रुग्णांचे बळी गेले आहेत. त्याच 24 तासात 2455 बाधित सापडले. मात्र बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2960 एवढी असल्याचे सरकारी आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. समाधानाची बाब म्हणजे गुरुवार, शुक्रवार या दोन दिवसात रुग्णांचे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण समाधानकारक प्रमाणात वाढले आहे. गुरूवारी सापडलेल्या 2491 बाधितांमधील 2266 जण बरे झाले होते तर शुक्रवारी 2455 बाधित सापडले असून त्यातील 2960 जण बरे झाले आहेत.

वर्षभरात 98200 जण झाले कोरोनामुक्त

राज्यात आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या 132585 वर पोहोचली आहे तर एकूण 98200 जण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 74.07 टक्के आहे. गत 24 तासात 246 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले तर 2121 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. सध्या 32387 सक्रीय रुग्ण आहेत.  वर्षभरातील बळींची संख्या 1998 एवढी झाली आहे.

केंद्रवार सक्रिय रुग्णसंख्या

डिचोली 766, सांखळी 1394, पेडणे 1347, वाळपई 919, म्हापसा 1444, पणजी 1848, हळदोणा 766, बेतकी 782, कांदोळी 1887, कासारवर्णे 293, कोलवाळ 679, खोर्ली 882, चिंबल 1278, शिवोली 1288, पर्वरी 1635, मये 362, कुडचडे 784, काणकोण 568, मडगाव 2523, वास्को 1007, बाळ्ळी 467, कासावली 996, चिंचिणी 470, कुठ्ठाळी 1314, कुडतरी 576, लोटली 840, मडकई 528, केपे 575, सांगे 514, शिरोडा 630, धारबांदोडा 586, फोंडा 1785 व नावेलीत 650 रुग्ण आहेत. त्याशिवाय रेल्वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले 4 बाधित सापडले आहेत.

Related Stories

लेखक प्रत्येकात असतो, तो व्यक्त होणे महत्त्वाचे

Patil_p

गांजा लागवडीस मान्यता दिल्यास आंदोलन

Omkar B

पाणी कमी वापरा, पाणी मोफत मिळवा!

Amit Kulkarni

ईद-ए-मिलाद निमित्त मडगावात जुलूस

Amit Kulkarni

बुधवारी 189 कोरोनामुक्त

Omkar B

फोंडय़ात मान्सुनपुर्व खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

Amit Kulkarni