Tarun Bharat

दिवसभरात 35,342 नवीन बाधितांची नोंद

Advertisements

देशात 483 जणांचा मृत्यू : 38,740 जणांना उपचाराअंती डिस्चार्ज

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी दररोजच्या रुग्णसंख्येत चढ-उतार होताना दिसत आहे. सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर गुरुवारी दिवसभरात रुग्णसंख्या घटली आहे. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारच्या चोवीस तासात देशात कोरोनाच्या 35 हजार 342 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर 483 जणांचा मृत्यू झाला आहे. याचदरम्यान 38 हजार 740 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार आता देशात बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. सध्या देशात 4 लाख 05 हजार 513 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात आतापर्यंत 3 कोटी 12 लाख 93 हजार 062 कोरोना रुग्ण आढळले आहेत. यापैकी 3 कोटी 4 लाख 68 हजार 079 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 4 लाख 19 हजार 470 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. लसीकरणाने देखील देशात जोर पकडला आहे. देशात 42 कोटी 34 लाख 17 हजार 030 लसीचे डोस देण्यात आले आहेत.

Related Stories

विशाखापट्टणमध्ये वायूगळती

Patil_p

ऑनलाईन शिक्षणासमवेत संस्कारांचेही हस्तांतरण

Patil_p

चिनी नागरिकांच्या भारत यात्रेवर निर्बंध

datta jadhav

जामीन मिळूनही लालूप्रसाद तुरुंगातच

Patil_p

भाजपने अपर्णा यादव यांचे तिकीट कापले

datta jadhav

‘ज्ञानवापी’ सुनावणी आता जिल्हा न्यायालयात

Patil_p
error: Content is protected !!