Tarun Bharat

दिवसभर बससेवा सुरळीत

बंदचा बससेवेवर परिणाम नाही, विविध मार्गावर धावल्या बस

प्रतिनिधी /बेळगाव

शेतकऱयांचे नेतृत्त्व करणाऱया किसान मोर्चाने सोमवारी भारत बंदची हाक दिली होती. मात्र वेगवेगळय़ा मार्गांवर बससेवा सुरळीत सुरू होती. या बंदला विविध शेतकरी संघटनांबरोबरच विविध पक्षांनीदेखील पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे परिवहन कर्मचारी संघटनादेखील आंदोलनाला पाठिंबा देईल, असे वाटत होते. मात्र परिवहन कर्मचारी संघटनेने आंदोलनाला पाठिंबा दिला नाही. त्यामुळे विविध मार्गावर दिवसभर बससेवा नियमितपणे सुरू होती.

हजारो शेतकऱयांनी उपस्थिती दर्शवून चन्नम्मा चौकात आंदोलन छेडले असले तरी बससेवेवर कोणताही परिणाम झाला नाही. शेतकऱयांनी सोमवारी पुकारलेल्या बंदला परिवहनचा प्रतिसाद मिळाला नसून जिल्हाअंतर्गत बससेवेबरोबर राज्यांतर्गत बससेवा सुरळीत सुरू होती. काही प्रमाणात प्रवाशांची संख्या कमी झाली होती. मात्र शहरासह ग्रामीण भागातील विविध मार्गांवर बस धावल्या. दरम्यान रविवारी परिवहनने बससेवा सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार बससेवा सुरळीत सुरू होती. सकाळी बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर काही शेतकऱयांनी टायर जाळून शासनाचा निषेध नेंदविला. हा एक निषेध वगळता बसस्थानक किंवा इतर मार्गावर कोणताही आंदोलनाचा प्रकार झाला नाही. त्यामुळे विविध मार्गांवर बससेवा सुरू होती. एप्रिल महिन्यादरम्यान परिवहन कर्मचाऱयांनी बेमुदत आंदोलन छेडले होते. त्यावेळी शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे सोमवारी होणाऱया शेतकऱयांच्या आंदोलनालादेखील परिवहन कर्मचारी संघटना पाठिंबा देईल, अशी आशा शेतकरी संघटनांना होती. मात्र परिवहन कर्मचाऱयांनी आंदोलनाला पाठिंबा न देता सेवेत हजर होऊन बससेवा सुरू ठेवली.

Related Stories

सोमवार पेठचा नामफलक घातला गटारीवर

Amit Kulkarni

बेळगाव -सुलधाळ मार्गावर धावले ताशी 120 कि.मी. वेगाने इंजिन

Amit Kulkarni

अनगोळचे भाविक सौंदत्ती यात्रेला जाणार

Amit Kulkarni

वाढती गुन्हेगारी, इराणी टोळीची स्वारी?

Amit Kulkarni

आशा, अंगणवाडी कार्यकर्त्यांकडून अहोरात्र परिश्रम

Patil_p

जांबोटी-बैलूर परिसरात काजू उत्पादनाला प्रारंभ

Amit Kulkarni
error: Content is protected !!