Tarun Bharat

दिवसात केवळ अर्धा तास झोप

Advertisements

जपानच्या व्यक्तीचा 12 वर्षांपासून दिनक्रम

मागील 12 वर्षांमध्ये दर दिवशी केवळ 30 मिनिटांची झोप घेतली आहे. तरीही मला कुठलाच थकवा जाणवत नसल्याचा दावा जपानच्या एका व्यक्तीने केला आहे. दरदिनी झोपण्याच्या 8 तासांना कमी करत केवळ 30 मिनिटांवर ही वेळ आणली आहे. याचा माझ्यावर कुठलाच नकारात्मक दुष्परिणाम झाला नसल्याचा दावा जपानच्या डाइसुके होरी याने केला आहे.

कमी झोपेचे तंत्रज्ञान

36 वर्षीय होरी ‘जपान शॉर्ट-स्लीपर असोसिएशन’चा अध्य आहे. तसेच कमी झोपून स्वतःची ‘उत्पादकता’ वाढवून एक उत्तम जीवनशैली कशी अवलंबवावी याचे धडे त्याने शेकडो लोकांना दिले आहे. कमी झोपच्या तज्ञाहंनी त्याला याकरता चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले होते. या कार्यक्रमाचे जपानच्या टेलिव्हिजनवर प्रसारण करण्यात आले आहे.

एका दिवसात जे करू इच्छित होतो, ते सर्वकाही करण्यासाठी 16 तास पुरेसे नसल्याची जाणीव मला झाली. याचमुळे मी माझा झोपेचा दिनक्रम कमी करण्याच्या पद्धतींसोबत प्रयोग करण्यास सुरुवात केल्याचे होरी यांनी सांगितले आहे.

काही वर्षांमध्येच स्वतःची झोप केवळ अर्ध्या तासापुरती मर्यादित करण्यास सक्षम होतो. तरीही थकव्याच्या जागी ‘तंदुरुस्त अणि ऊर्जावान’ असल्याचे मला जाणवते असा दावा त्यांनी केला आहे. स्वतःच्या अविश्वसनीय क्षमतेला सिद्ध करण्यासाठी होरी यांनी स्वतःची अनोखी जीवनशैली, ओडिटी सेंट्रलच्या रिपोर्टचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी एका वाहिनीच्या प्रतिनिधीला तीन दिवसांसाठी स्वतःच्या घरात ठेवले. आश्चर्याची बाब म्हणजे होरी केवळ 30 मिनिटे झोपून पुन्हा स्वतःच्या कामाला लागले होते.

Related Stories

सोने ‘पन्नाशी’पार, चांदीलाही चकाकी

Patil_p

जगातील सर्वात उंच श्वान

Patil_p

चेहऱयावर टॅटूसह अँकरिंग

Amit Kulkarni

सिनेसम्राट दिलीपकुमार यांनी कोल्हापूरवासीयांबद्दल काढले होते ”हे” गौरवोद्गार

Archana Banage

‘गुरु-शनि’ महायुतीचा आज दिसणार नजारा

Patil_p

18 फूट लांबीचे पेन

Patil_p
error: Content is protected !!