Tarun Bharat

दिवाडी शक्तिविनायक देवस्थानचा आजपासून वर्धापन सोहळा

प्रतिनिधी / तिसवाडी

नावेली-दिवाडी येथील श्री शक्तिविनायक देवस्थानाचा विसावा वर्धापन सोहळा दि. 14 ते 17 पर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनिशी साजरा करण्यात येणार आहे.

दि. 14 रोजी सकाळी 9 वा. धार्मिक विधी, पूजा, प्रसाद व नंतर दिवाडी बेटावरील प्रत्येक मंदिराला मिरवणुकीने भेट व धार्मिक विधी होतील.

दि. 15 रोजी गणेशजयंतीनिमित्त सकाळी 8.30 गणेश याग, दु. 12.30 वा. गणेश जन्म, सायं. 7.30 वा. पालखी मिरवणूक, आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होणार आहे. या सोहळय़ाचे यजमान श्री. व सौ. स्वाती सर्वेश नाईक साळगावकर आहेत. सायं. 7.30 वा. श्रींची पालखीतून मंदिराभोवती मिरवणूक, सुहासिनींतर्फे दिपोत्सव, नंतर भजनाचा कार्यक्रम, आरती व तीर्थप्रसाद होईल. दि. 16 रोजी सकाळी 7 ते दु. 12.30 पर्यंत स्वहस्ते अभिषेक, सायं. 7.30 वा. भजन, प्रार्थना, आरती व तीर्थप्रसाद होईल. दि. 17 रोजी सकाळी विविध धार्मिक विधी, दु. आरती, तीर्थप्रसादाने उत्सवाची सांगता होईल. यंदा वेळेनुसार फळावळांची पावणी केली जाईल. मास्क वापरणे बंधनकारक राहील, असे समितीतर्फे कळविण्यात आले आहे.

Related Stories

कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मी मागितलेला नाही

Amit Kulkarni

आयएफबीच्या 130 कर्मचाऱयांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी तातडीने सोडवावा

Omkar B

शिवाजी महाराज हे युगपुरुष : कामत

Amit Kulkarni

वेर्ला काणकातील श्री साईंचा आज, उद्या पालखी उत्सव

Amit Kulkarni

कुंकळळीत भाजपमध्ये बंडखोरीची शक्यता

Amit Kulkarni

सत्तरीतील 400 वीज थकबाकीदारांना नोटिसा

Amit Kulkarni