Tarun Bharat

दिवाळीच्या साहित्यांनी सजली बाजारपेठ

प्रतिनिधी/ सातारा

सहा दिवसांवर दिवाळी आली असून, त्यासाठी लागणाऱया विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. विविध रंगाचे कागदी, कापडी आणि प्लास्टिकच्या आकाश कंदील विक्रीसाठी दाखल झाले आहेत. यंदा कोरोनामुळे उत्साह कमी दिसत असला तरी परंपरेनुसार दिवाळी सण साजरी करण्यावर सगळेच भर देताना दिसत आहेत.

        दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण यामुळे यांचे प्रमुख आकर्षण आकाश कंदील असते. शहरातील मोती चौक ते पोवईनाका या मार्गावरील सर्व विक्रेत्यांनी आकाश कंदील विक्रीसाठी ठेवले आहेत. यामध्ये लहान, मध्यम, मोठे असे स्वरूपात कंदील उपलब्ध आहेत. गोल, षटकोन, उभा, हंडी, स्टार, झालरचे रंगबेरंगी आकाश कंदील ग्राहकांना भूरळ पाडत आहेत. पूर्वी कागदी आकाश कंदील घरी बनवण्यात येत होते. आता रेडीमेड खरेदीचा कल वाढला आहे. यामुळे ग्राहकांच्या मागणीनुसार विक्रेतेही व्हरायटीनुसार कंदील विक्रीसाठी आणत आहेत. प्लास्टिक वापरावर बंदी असताना ही प्लास्टिकचे कंदीलही बाजारात आले आहेत. यांची किमंत 200 रूपयांपासून ते 1 हजार रूपये या दरम्यान आहे. मोठया कंदीलाबरोबर सजावटीसाठी छोटे कंदीलही वापरतात. या कंदीलाचे पाकिटात 12 कंदील असतात. त्यांची किंमत साधारण 90 ते 120 रूपयांपर्यत आहे.

         यंदा कोरोनामुळे दिवाळी सणाचा उत्साह कमी दिसत आहे. गत वर्षीचा आकाश कंदील लावून यंदा दिवाळी साजरी करण्यावर भर दिला जात आहे. तर बाजारपेठेतील दुकानांत खरेदीसाठी गर्दी होत आहे. सायंकाळच्या वेळी संपूर्ण बाजारपेठ आकाश कंदीलाच्या प्रकाशामुळे उजळून निघत आहे. 

Related Stories

काळोशीतील सागवान अंबवडे येथे वनविभागाने केले जप्त

Abhijeet Khandekar

आठ दिवसात बिले जमा करा अन्यथा अंदोलन करू

Archana Banage

मुश्रीफांच्या प्रश्नांवर नवोदिता घाटगे म्हणाल्या, रावणालाही अहंकार होता, आता जनताच ठरवेल रामराज्य हवे कि नको

Abhijeet Khandekar

महाराष्ट्रात 14 लाखांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

धान्य गोदाम दुरूस्ती कामकाज युध्दपातळीवर सुरू

Patil_p

अमोल कोल्हेंनी शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच संजय राऊतांची घेतली भेट, ट्वीट करत म्हणाले…

Archana Banage