Tarun Bharat

दिवाळीत कर्नाटकात फक्त ग्रीन फटाक्यांना परवानगी

बेंगळुरु / प्रतिनिधी

राज्य सरकारने दिवाळीच्या काळात फक्त हिरवे फटाके विकण्यास आणि फोडण्यास परवानगी दिली आहे. शनिवारी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 1 ते 10 नोव्हेंबर दरम्यान हिरवे फटाके विकण्यासाठी दुकानांना अधिकाऱ्यांकडून आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

स्टॉल नेमलेल्या ठिकाणी असावेत जिथे खेळती हवा ,मोकळी मैदाने असावीत. दोन दुकानांमध्ये सहा मीटर अंतर असावे. स्टॉल मालकांना थर्मल स्क्रीनिंग, सॅनिटायझर वापरावे लागेल तसेच ग्राहकांसाठी सहा-फूट सोशल डिस्टन्सिंगची चिन्हे तयार करावे लागतील. विक्रेते आणि ग्राहकांनी फेसमास्क घालणे आवश्यक असुन परवाना घेतलेल्या व्यक्तीने स्टॉलवर उपस्थित असणे आवश्यक आहे.

आदेशाचे उल्लंघन केल्यास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा-2005 अंतर्गत कारवाई केली जाईल.अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागाने सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

Related Stories

कर्नाटकचे वनमंत्री आनंद सिंग यांना कोरोनाचा संसर्ग

Tousif Mujawar

तालुक्यात प्लास्टिक विक्री करणाऱयांवर होणार कडक कारवाई

Patil_p

राज्यात आठ जिल्हय़ांमध्ये धाडी

Amit Kulkarni

कर्नाटकी अन्यायांच्या जोखडातून सीमावासियांना सोडवा

Amit Kulkarni

अंमली पदार्थमुक्त राज्यासाठी अभाविपची पत्रमोहीम

Patil_p

बसपास वेळेत मिळविणे आवश्यक

Omkar B