Tarun Bharat

दिवाळीत कोरोनाकडे दुर्लक्ष नको

Advertisements

रविवारी 45 नवे रुग्ण, रुग्णसंख्या 25 हजाराकडे

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. खासकरून मास्क व सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतर याविषयी जागृती केली जात आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून बेळगावसह कर्नाटकात कोरोना रुग्णसंख्या घटत चालली आहे. दिवाळीत कोणीही दुर्लक्ष करू नये, नपेक्षा हे दुर्लक्ष महागात पडणार आहे.

कोरोनाची दुसरी लाट कशी असेल, याविषयी तज्ञ डॉक्टर वारंवार इशारा देत आहेत. हिवाळय़ात रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढण्याचा धोका आहे. दसरा, ईद-ए-मिलाद, राज्योत्सव झाले. आता दिवाळीची प्रतीक्षा आहे. दिवाळी म्हटली की मोठा उत्साह असतो. यंदा सर्व सण साध्या पद्धतीने झाले आहेत. पण हिवाळय़ात कोरोनाकडे दुर्लक्ष परवडणारे नाही.

रविवारी जिल्हय़ातील 45 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण रुग्णसंख्या 24 हजार 718 वर पोहोचली असून तिची 25 हजारांच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. जिल्हय़ातील 23 हजार 850 जणांनी कोरोनावर मात केली असून सध्या 534 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत 334 जणांचा बळी गेला आहे.

936 जणांचे अहवाल यायचे आहेत. जिल्हय़ातील 26 हजार 760 जण चौदा दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. आतापर्यंत 2 लाख 22 हजार 211 जणांची स्वॅब तपासणी झाली आहे. 1 लाख 95 हजार 217 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून बेळगाव शहर व जिल्हय़ात रुग्णसंख्येत घट होत चालली असली तरी दिवाळीच्या तोंडावर कोरोनाचा धोका वाढण्याचा इशारा दिला जात आहे.

Related Stories

कर्नाटक: पीपीई किट उघड्यावर टाकल्याने विषाणूचा धोका वाढतोय

Abhijeet Shinde

अपुऱया पावसाने बळीराजाची चिंता वाढली

Amit Kulkarni

कॅन्टोन्मेंटच्या खजिन्यात ठणठणाट

Amit Kulkarni

अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची घाईगडबड

Patil_p

लाल-पिवळय़ाबाबत कायद्याच्या चौकटीत निर्णय

Patil_p

गौंडवाड ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आवाहन

Amit Kulkarni
error: Content is protected !!